गोंदियात ऑनलाईन फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश

-छत्तीसगडचे दोन आरोपी जेरबंद - बँक खाते, मोबाईलसह 32 हजारांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
गोंदिया,
online fraud racket स्थानिक लोकांची बँक खाती पैशाच्या आमिषाने मिळवून त्यांचा वापर ऑनलाईन फसवणुकीसाठी करणार्‍या टोळीचा गोंदिया स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाईत बँक खाते, चेकबुक, सिम कार्ड व तीन अँड्रॉइड मोबाईलसह 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
 

chattisgad 
 
 
शहरातील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत 15 जानेवारी रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना शहरातील तिरोडा मार्गावरील हॉटेल आर्चिड येथे काही इसम ऑनलाईन आर्थिक गैरव्यवहार करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकून दोन इसमांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी त्यांची नावे शेख आसिफ शेख अहमद (27) व सचिनकुमार संतोष पटेल (22), दोन्ही रा. दंतेवाडा, छत्तीसगड अशी सांगितली.online fraud racket पोलिसानी त्यांना विचारण केली असता पैशाचे आमिष दाखवून स्थानिक नागरिकांकडून बँक खाती उघडून, खातेदारांचे सिम कार्ड व संपूर्ण बँक किट ताब्यात घेवून त्यांच्या खात्याचा वापर ऑनलाईन गेमिंग व अन्य डिजिटल माध्यमांतून आर्थिक व्यवहार करून फसवणूक करण्यासाठी केला जात असल्याचे सांगीतले. आरोपींच्या ताब्यातून बँक ऑफ इंडियाचे करंट खाते, चेकबुक, सिम कार्ड व तीन अँड्रॉइड मोबाईल फोन असा 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाणे येथे आरोपींविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 319 (2), 318 (4), 338, 336 (3), 340 (2), 3 (5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरिक्षक वनिता सायकर, पोलिस हवालदार प्रकाश गायधाने, महेश मेहर, दीक्षित दमाहे, संजय चव्हाण, इंद्रजित बिसेन, पोलिस शिपाई संतोष केदार, दुर्गेश पाटील, प्रमोद सोनवाने, रोशन येरणे, चालक पोलिस शिपाई खंदारे यांनी केली आहे.