पुण्याचा महापौर कोण होणार? 'या' तीन प्रमुख नावाची चर्चा

भाजपचा एकतर्फी विजय

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
पुणे,
PMC elections Election  2026 पुणे महानगरपालिका (PMC)च्या 165 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. त्यानंतर 16 जानेवारी रोजी पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, आणि भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून एकतर्फी विजय प्राप्त केला आहे. पुण्यात या निवडणुकीत प्रमुख लढत भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून आपल्या जाहीरनाम्यात पुणेकरांना मोफत मेट्रो आणि बस प्रवासाचे आश्वासन दिले होते. तरीही, पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आश्वासनावर विश्वास न ठेवता भाजपला निवडून दिले.
 

PMC elections Election  2026 
चर्चेत तीन नावे
पुणे महापालिका PMC elections Election 2026  निवडणुकीत भाजपने 165 जागांपैकी 119 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 27 जागा, शरद पवार गटाला 3 जागा, काँग्रेसला 15 जागा, शिवसेना (UBT)ला 1 जागा, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही. भाजपच्या या विजयानंतर पुणे महापालिकेच्या महापौरपदावर भाजपचा वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे.भाजपच्या विजयामुळे महापौरपदावर कोण बसणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महापौरपदासाठी तीन प्रमुख नावे चर्चेत आहेत. या नावाांमध्ये भाजपचे जेष्ठ नेते आणि नगरसेवक, तसेच महापालिकेतील अनुभवी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. महापौरपदाच्या आरक्षणानुसार उमेदवार निश्चित होईल, मात्र त्यापूर्वी तीन प्रमुख उमेदवारांची नावे समोर येत आहेत.
 
 
गणेश बिडकर
गणेश बिडकर हे PMC elections Election 2026 पुणे शहरातील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणून यापूर्वीही काम केले असून, महापालिकेच्या कामकाजाचा चांगला अनुभव त्यांना आहे. निवडणुकीच्या निकालाच्या अगोदरच पुण्यात त्यांच्या महापौरपदाच्या नावाचे बॅनर लागले होते. हे बॅनर देखील पुण्यात चर्चेचा विषय बनले होते. प्रभाग 24 (कसबा गणपती-केईएम हॉस्पिटल) मध्ये भाजपच्या पॅनेलने इतर पक्षांचे उमेदवार पराभूत केले, आणि गणेश बिडकर यांचे नेतृत्व निर्णायक ठरले.
 
 
 
राजेंद्र शिळीमकर
 
राजेंद्र शिळीमकर हे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावरील विश्वास आणि त्यांचा महापालिकेतील अनुभव त्यांना महापौरपदासाठी एक मजबूत दावेदार बनवतो. शिळीमकर यांचे नाव महापौरपदाच्या शर्यतीत असल्याचे चर्चा आहेत, आणि यंदा त्यांनी बिबवेवाडीतील प्रभाग 20 मध्ये मोठा विजय मिळवला आहे.
 
 
धीरज घाटे
 
धीरज घाटे हे भाजपचे शहराध्यक्ष असून, महापालिकेतील सभागृह नेतेपदाचा अनुभव देखील त्यांना आहे. पुणे महापालिकेतील निवडणुकीत धीरज घाटे यांच्या पॅनेलने प्रभाग 27 (नवी पेठ-पर्वती) मध्ये दणदणीत विजय मिळवला. यामुळे त्यांचं महापौरपदासाठी नाव देखील चर्चेत आहे.पुणे महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महापौरपदाच्या आरक्षणाची प्रक्रिया लवकरच पार पडेल. आरक्षणानुसारच महापौरपदासाठी अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाईल. त्यामुळे भाजपच्या कक्षेतून कोण महापौरपदावर विराजमान होईल, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.पुणे महापालिकेतील भाजपच्या विजयानंतर पुण्याच्या महापौरपदाची शर्यत अधिकच रंगतदार होईल. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान कमी होऊ शकले असले तरी, PMC elections Election 2026 पुण्यात भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. आगामी महापौरपदाची निवड पुणेकरांसाठी एक महत्त्वपूर्ण चर्चेचा विषय बनलेला आहे.