पुणे महापालिका निवडणुकीत 'फॅमिली कॉम्बो'

कुटुंबाच्या सदस्यांची विजयाची परंपरा कायम

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
पुणे,
Pune Municipal Corporation election पुणे महापालिका निवडणुकीत या वर्षीही कुटुंबातील सदस्यांचा विजयाची परंपरा कायम राहिली आहे. अनेक कुटुंबांतील सदस्य एकाच वेळी महापालिकेच्या सभागृहात दिसणार आहेत. या निवडणुकीत पती-पत्नी, भाऊ-बंधू, सासू-सून या कुटुंबाच्या सदस्यांनी मोठा विजय मिळवला आहे, ज्यामुळे विविध प्रभागांतील कुटुंबांची उपस्थिती सभागृहात निश्चित होणार आहे.
 

Pune Municipal Corporation election 
पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation election प्रभाग क्रमांक ३, विमाननगर लोहगावमधून भाजपच्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि प्रभाग क्रमांक ४, खराडी वाघोलीमधून भाजपचे सुरेंद्र पठारे हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे, प्रभाग क्रमांक ११, रामबाग कॉलनी शिवतीर्थनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे हर्षवर्धन दीपक मानकर आणि प्रभाग क्रमांक २५, महात्मा फुले मंडईमधून भाजपचे राघवेंद्र मानकर हे दोन भाऊ विजयी झाले आहेत.प्रभाग क्रमांक २३, रविवारपेठ नाना पेठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी सासू-सून म्हणून एकाच वेळी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही उमेदवारांचा पार्श्वभूमीतील गुन्हेगारी इतिहास आहे. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांच्यावर आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोप आहेत, आणि त्या सध्या तुरुंगात असून त्यांची निवडणूक लढवली होती. तथापि, त्यांना मतदारांचा विश्वास मिळाला आणि ते महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करतील.
 
 
याशिवाय, प्रभाग क्रमांक १०, बावधन Pune Municipal Corporation election भुसारी कॉलनीमध्ये कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. याचप्रमाणे, प्रभाग क्रमांक ३९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बापू नायर यांचा पराभव झाला आहे.महापालिकेच्या निवडणुकीत एक महत्त्वाची बाब म्हणजे दिवंगत आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांचा विजय. भाजपने दिवंगत आमदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक, दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण आणि माजी राज्यमंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार हे सर्व उमेदवार विजय झाले आहेत. याशिवाय, राष्ट्रवादीचे बापू पठारे यांच्या कुटुंबातून त्यांचा मुलगा युगेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे भाजपकडून विजयी झाले आहेत.
 
 
या निवडणुकीत कुटुंबाच्या एकजुटीची ताकद दिसून आली आहे. विविध कुटुंबातील सदस्य एकाच वेळी महापालिकेच्या सभागृहात असणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या सहकार्याने पुणे शहराच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.