सावरगाव येथील शेतकर्‍याच्या तुरीच्या गंजीला आग

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
मंगरूळनाथ, 
savargaon-fire-news : तालुक्यातील सावरगाव येथील एका शेतकर्‍याच्या तुरीच्या गंजीला आग लागून ७५ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकर्‍याने १७ रोजी तहसीलदार यांच्याकडे लेखी मागणी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
 
 
 
jkl
 
 
निवेदनात नमूद आहे की, सावरगाव येथील शेतकरी दिगंबर नामदेव इंगोले १७ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आपल्या शेतात गेले असता तुरीच्या गंजीला आग लागल्याचे दिसून आले. या आगीत शेतकर्‍याचे आठ क्विंटल दोन किंमत ७५ हजार रुपये नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे ही नुकसान भरपाई शासनाने तात्काळ द्यावी अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.