सनफ्लॅग कंपनीत कामगाराचा अपघाती मृत्यू

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
वरठी,
Sunflag Steel Company येथील सनफ्लॅग स्टील कंपनीत एका कामगाराचा अपघाती मृत्यू झाला. यानंतर तप्त झालेल्या कामगारांनी मृत कामगाराचे शव प्रवेशद्वारा पुढे ठेवून विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.
 

Sunflag Steel Company 
कंपनीत क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले पाचगाव येथील मारुती भिवगडे आज 17 रोजी कर्तव्यावर असताना 70 फूट उंचीवरून खाली पडले. जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यांना रुग्णालयात देण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. सकाळी 10 वाजताच्या घडलेल्या या घटनेनंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला. परंतु तो घरी न नेता नातेवाईकांनी आणि कंपनीच्या प्रवेशद्वारा पुढे आंदोलन सुरु केले. भरीव मदत आणि अन्य मागण्यासाठी हे आंदोलन सुरू होते. आंदोलनामुळे काही काळ वातावरण चिघळले. याच दरम्यान कंपनी व्यवस्थापनाशी चर्चाही सुरू होती. या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप होत काहींनी श्रेयवादचा विषय केल्याचीही चर्चा आहे.
आवश्यक ती सर्व मदत कंपनी करणार : श्रीवास्तव
झालेली घटना दुर्दैवी आहे. कामगाराच्या कुटुंबासोबत कंपनी व्यवस्थापन आहे. नियमानुसार देय असलेले सर्व लाभ मृतकाच्या कुटुंबाला दिले जाते. सोबतच कामगाराच्या पत्नीला नोकरी, मुलाची ला कंपनीच्या शाळेत शिक्षण देण्याचीही आमची भूमिका आहे. दुर्दैवी घटनेच्या माध्यमातून राजकारण होऊ नये, एवढी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया कंपनीचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक सतीश श्रीवास्तव तभाला दिली.