गोपुरीच्या चार महिला कारागीर प्रजासत्ताकदिनी जाणार दिल्लीला

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
republic-day : ग्रामसेवा मंडळ गोपुरीच्या चार महिला कारागिरांना गणराज्य दिनी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर होणार्‍या देशाच्या प्रजासत्ताकदिनाच्या मुख्य राष्ट्रीय कार्यक्रमात विशेष पाहुण्या म्हणून सहभागी होण्याचा मान मिळणार आहे. या चारही महिला कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
 
 
jkhj
 
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार) कर्तव्य पथ येथे होणार्‍या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य समारंभ बघण्यासाठी भारत सरकारच्या वतीने विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले जाते. खादीविकास योजनेंतर्गत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणार्‍या महिला कारागिरांना त्यांच्या जोडीदार अथवा पालकांसह पाचरण केले जाते. त्यांची रेल्वेच्या एसी-३ टायरमध्ये ये-जा करण्याची खास व्यवस्था केली जाते. यावर्षी गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाच्या चार महिलांना भारत सरकारच्या विशेष पाहुण्यांचा मान मिळाला आहे. चार महिला कारगिरांना प्रजासत्ताकदिन समारंभात भारत सरकारचे विशेष पाहुणे म्हणून सहभागी होण्यासाठी केव्हीआयसीच्या सीईओने मान्यता दिली आहे.
 
 
आसावरी साकोलीकर, लीला गायकवाड, विजया वानखेडे आणि शिला धुरत या चार महिला कारागिरांना भारत सरकारच्या विशेष पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या विशेष पाहुण्यांची काळजी आणि समन्वय साधण्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून खास अधिकार्‍यांची नियुती केली आहे. नागपूरच्या विभागीय कार्यालयाला विशेष पाहुण्यांसाठी, त्यांचे पती, पत्नी, पालकांसह प्रवासाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे. महिला कारगिरांना २४ जानेवारीला नवी दिल्लीत पोहोचावे लागणार आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात सहभागी झाल्यानंतर २७ जानेवारीला परतीच्या प्रवासाला निघावे लागणार आहे.