गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर ट्रक जप्त

-45 गोवंशीय बैलांची सुटका, 44 लाखांचा मुद्देमाल जप्त -वडकी पोलिसांची कारवाई

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
राळेगाव, 
illegal-transportation-of-cattle : नागपूरवरून तेलंगण राज्यातील हैद्राबाद येथे ट्रकमध्ये जनावरे कोंबून वाहतूक करणाèया कंटेनर वाहनाचा पाठलाग करून वडकी पोलिसांंनी 45 गोवंशीय बैलाची सुटका केली. यात कंटेंनर ट्रक जप्त करून वाहनचालकासह 2 जणांविरूद्ध वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
y17Jan-Janaware
 
ही कारवाई वडकी पोलिसांनी नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील देवधरी घाटात शुक्रवार, 16 जानेवारी रोजी 5 च्यादरम्यान करण्यात आली. नागपूरवरून हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती वडकी पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवधरी घाटात सापळा रचला.
 
 
याच दरम्यान, नागपूर येथून येणाèया युपी21 एचई7398 क्रमांकाच्या कंटेनर ट्रकला नाकेबंदी करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला.
 
 
आरोपी ट्रकचालक व त्याचे साथीदार पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.ट्रकची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात 42 गोवंशीय बैल व 3 मृत असे 45 गोवंशीय बैल आढळून आले याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर ट्रक जप्त करून या कारवाईत जप्तीतील ट्रक किंमत 30 लाख व 45 गोवंश बैल किंमत 14 लाख 70 हजार रु. एकंदरीत 44 लाख 70 हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
 
 
यातील कंटेनर जप्त करून यातील आरोपी शहा आलम मोहंमद फारुख (वय 32, भोजपूर उत्तरप्रदेश), शाहरुख अली (वय 29, मेरठ उत्तरप्रदेश), सरताज कल्लू (वय 35, कुंदरकी उत्तरप्रदेश) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत वडकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
 
 
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुखदेव भोरकडे, पोलिस अंमलदार भोजराज करपते, सचिन नेवारे, नीलेश वाढई, अरविंद चव्हाण, दीपक मडकाम यांनी पार पाडली.