भाजपातील पराभूत उमेदवारांची तक्रार प्राप्त : बावनकुळे

    दिनांक :18-Jan-2026
Total Views |
समिती पाठवून सर्वांची मते जाणून घेऊ
 
अमरावती, 
महापलिकेतील भाजपाच्या पराभूत उमेदवारांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यांचे व पदाधिकारी अशा सर्वांचे म्हणने ऐकूण घेणार आहोत, अशी प्रतिक्रीया भाजपाचे राज्य निवडणूक प्रमुख व अमरावतीचे पालकमंत्री Chandrashekhar Bawankule चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
 

bavankule 
 
नागपूर येथे वृत्तवाहीन्यांच्या प्रतिनिधींनी अमरावतीत भाजपा उमेदवारांकडून झालेल्या तक्रारींवर पालकमंत्री बावनकुळे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी उपरोक्त प्रतिक्रीया दिली. पुढे ते म्हणाले, अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपाचे जे उमेदवार पराभूत झाले, त्यांची नाराजी आहेच. निवडणुकीचे विश्लेषण करावे लागेल. कोणी कोणी विरोधात काम केले. कोणामुळे कोणाचे उमेदवार पडले, याचेही सखोल विश्लेषण होईल. पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे. त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. आम्ही लवकरच एक चौकशी समिती अमरावतीला पाठविणार आहोत. सर्वांचे म्हणने ऐकूण घेणार आहोत. त्यानंतर निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रीया भाजपाचे राज्य निवडणूक प्रमुख व अमरावतीचे पालकमंत्री Chandrashekhar Bawankule चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
 
 
 
‘त्या’ तक्रार पत्राशी माझा संबध नाही : अतकरे
भाजपा नेत्या नवनीत राणा व शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या संदर्भात तक्रारीचे जे पत्र समोर आले आहे. त्यावर माझे नाव व स्वाक्षरी आहे. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी स्वाक्षरी केलेली नाही, असा खुलासा प्रभाग १७ येथील नवनिर्वाचीत नगरसेवक आशिष अतकरे यांनी केला आहे.
 
(आशिष अतकरे)