श्रीहरीनगर मंडळाच्या ज्येष्ठ नागरिकांची दर्शनीय सहल

    दिनांक :18-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Shriharinagar Mandal श्रीहरीनगर ज्येष्ठ नागरिक मंडळाने दोन दिवसीय दर्शनीय सहल आयोजित केली होती. कार्यक्रमाची सुरुवात भक्तमंडळींनी खडकी येथील संकट मोचन हनुमानजींचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर सर्वांनी नाश्ता करून माहूरगडसाठी प्रस्थान केले. मार्गेत कळंबच्या समोर मानापुर येथील गार्डनमध्ये वनभोजनाचा आस्वाद घेतला आणि निसर्गाचे सौंदर्य अनुभवले. सहभागी लोकांनी "वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे" हे गाणे गाऊन निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला.
 
 
Shriharinagar Mandal
 
माहूरगड पोहचल्यावर भक्तमंडळींनी आई रेणुकामाते, परशुराम, अनुसया माते व दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. परतीच्या प्रवासात डोंगरदऱ्यांची निसर्गरम्य झाडी, परिसराची रम्यता आणि गावातील रात्रीच्या दिव्यांचे दृश्य पाहून सर्वांचे मन आनंदाने भरून आले. Shriharinagar Mandal सायंकाळी कुलस्वामिनी हॉटेलमध्ये स्वादिष्ट भोजन केले.
 
दुसऱ्या दिवशी रविवारला माहूर येथे नाश्ता करून भक्तमंडळी कळंबसाठी प्रस्थान केले. कळंब येथे चिंतामणींचे दर्शन घेऊन प्रसादालयात भोजन केले. या सहलीसाठी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरने विनामूल्य बस उपलब्ध करून मदत केली. प्रतिष्ठानतर्फे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. राजीव मिश्रा (सचिव) यांचे आभार व्यक्त करण्यात आले. Shriharinagar Mandal सहल यशस्वी करण्यासाठी श्रीहरीनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातील पदाधिकारी सुरेशराव उरकुडे, विठ्ठलराव घोडे, डॉ. अशोक मंदे, नामदेवराव खाटके, प्रवीण सुरकर, हरीश लाकडे, नरहरी महाजन, अशोक कोरडे, साहेबराव सरोदे, अशोक माहुरे, वडीखाये, वराडकर, मंगला उरकुडे, पुष्पा सुरकर, रेखा लाकडे, कोल्हे यांचे सहकार्य लाभले.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र