बीड,
fraudulent-voting-in-the-pimpri-chinchwad पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या निवडणुकीत बोगस आणि दुबार मतदान झाल्याचा संशय व्यक्त होत असतानाच, बीड जिल्ह्यातील महिलांना पिंपरी-चिंचवडमध्ये आणून जबरदस्तीने बोगस मतदान करवून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथील एका महिला बचत गटातील महिलांना राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्र केले. या महिलांना जेजुरी येथे देवदर्शनासाठी नेले जाणार असल्याचे सांगण्यात आले. धार्मिक यात्रेच्या निमित्ताने जात आहोत या विश्वासावर महिलांनी होकार दिला. 14 जानेवारीच्या रात्री त्यांना एका वाहनात बसवण्यात आले. मात्र सकाळी जाग आल्यानंतर महिलांना धक्का बसला, कारण त्या जेजुरीऐवजी थेट पिंपरी-चिंचवडमध्ये पोहोचल्या होत्या. ‘योजना बदलली आहे’ असे सांगून त्यांची समजूत काढण्यात आली. fraudulent-voting-in-the-pimpri-chinchwad 15 जानेवारी रोजी सकाळी या महिलांना पुण्यात नेण्यात आले. तेथे त्यांना बोगस मतदान ओळखपत्र देण्यात आले आणि मतदान करण्यास सांगितले गेले. महिलांवर मानसिक दबाव टाकून मतदान करवून घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. अनेक महिलांना आपण नेमक्या कशात अडकतोय याची कल्पनाही नव्हती. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी मतदान केल्याचे महिलांनी सांगितले आहे.
घरी परतल्यानंतर या महिलांनी थेट बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत आपली व्यथा मांडली. बचत गटाच्या सदस्या मंदा चव्हाण यांनी सांगितले की, सुरुवातीला गटाची बैठक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पुण्यात पोहोचल्यानंतर अचानक मतदान करण्यास सांगितल्याने आम्ही घाबरलो. fraudulent-voting-in-the-pimpri-chinchwad पोलीसांनी घाबरू नका असे सांगितले, पण कोणतेही पैसे देण्यात आले नाहीत. चार बस भरून महिला पुण्यात आणल्या गेल्या होत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांचा दावा आहे की, हा सर्व प्रकार फसवणुकीचा होता. पोलिसांनी आम्हाला काही काळ ताब्यात ठेवले होते. दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले, आम्ही सगळ्या महिला रडत होतो. शेवटी चौकशीनंतर आम्हाला सोडण्यात आले, असे त्यांनी सांगितले. या गंभीर प्रकरणामुळे आता पोलीस प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोगस मतदानाच्या आरोपांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा वाद आणखी गडद होण्याची शक्यता आहे.