नागपूर,
Vikas Thackeray मागील महानगरपालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा सहा जागांची वाढ ही लक्ष्यप्राप्ती नसली तरी ध्येयाच्या दिशेने काँग्रेसने झेप घेतली असल्याचे द्योतक ठरली आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या पश्चिम नागपूर क्षेत्रात 4 जागा वाढल्या, हे विशेष.
गेल्या निवडणुकीत पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेसला 8 जागांवरच समाधान मानावे लागले होते. यावेळी 12 जागी उमेदवारांनी विजय मिळवला. हा विजय ठाकरे यांचे सक्षम नेतृत्व, सक्षम नियोजन व संघटनेच्या एकजुटतेचा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. या यशाने काँग्रेस वर्तुळात विकास ठाकरे यांना ‘किंगमेकर’ म्हटले जात आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या 29 जागा होत्या. यंदा 6 जागा वाढल्या असून 34 झाल्या आहेत.याबााबत आ. विकास ठाकरे यांनी सांगितले की,काँग्रेसने यंदा ‘मिशन 100’ हे लक्ष्य ठेवले होते. मुळात मागील 10 वर्षांपासून विकास ठाकरे यांनी काँग्रेसची तरुण पिढी घडवली. या निवडणुकीत उमेदवार निवडण्याचे अधिकार त्यांनी स्थानिक नेत्यांना दिला. समाजातील सर्व घटकांना उमेदवारी दिली जातील, याची विशेष काळजी घेतली. जमिनीवरील सक्रिय तसेच समाजात मोठी भूमिका बजावू शकतील, अशा तरुण कार्यकर्त्यांनाना उमेदवारी दिली.
याचा परिणाम असा झाला की उमेदवारी देतेवेळी नाराजी, बंडखोरी नसल्यासारखीच होती. पूर्व नागपुरात अभिजित वंजारी व उमाकांत अग्निहोत्री यांच्यासोबत, उत्तर नागपुरात नितीन राऊत, मध्य नागपुरात बंटी शेळके व अतुल कोटेचा, दक्षिण नागपुरात गिरीश पांडव, दक्षिण-पश्चिम नागपुरात प्रफुल गुडधे पाटील यांना विश्वासात घेऊन उमेदवारी देण्यात आली.
काँग्रेसला उमेदवारच मिळणार नाहीत, अशी चर्चा असली तरी उलट, उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा होती. विकास ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना समजावून सांगितले की त्यांचा लढा केवळ राजकीय व सोपाही नाही. भाजपाच्या मुबलक संसाधनांसोबतही लढावे लागेल.
कार्यकर्त्यांचा विजय
हा विजय कार्यकर्त्यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया आ. विकास ठाकरे यांनी व्यक्त केली. विशेषतः प्रभाग 11 मध्ये दिग्गज व अनुभवी उमेदवार होते. पण, काँग्रेसचे कार्यकर्ते मागील बèयाच वर्षांपासून तेथे काम करत होते. अशांना जनतेने स्वीकारले. जागा आणखी वाढल्या असत्या. एमआयएम, मुस्लिम लिगचे उमेदवार निवडून आले. बèयाच ठिकाणी थोड्या फार फरकाने इतर पक्षांचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे मिशन 100 शक्य होऊ शकले नाही, असे आ. ठाकरे म्हणाले.