नागपूर,
Ghoti Tok and Vadamba Substations Earn ग्राहकांना गुणवत्तापूर्ण व अखंडित वीज सेवा देण्यासाठी उपकेंद्रांचे सक्षमीकरण करणाèया शिरपेचात महावितरणच्या शिरपेेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नागपूर ग्रामीण मंडळांतर्गत येणाèया घोटीटोक आणि वडंबा या 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्रांना जागतिक स्तरावरील ‘आयएसओ 9001:2015 हे मानांकन प्राप्त झाले आहे.
दुर्गम व आदिवासीबहुल भागातील 72 गावांना या उपकेंद्रांमार्फत वीज पुरवठा केला जातो. महावितरणच्या ध्येय-धोरणांनुसार, या दोन्ही उपकेंद्रांमधील सर्व उपकरणांची व प्रणालींची व्यापक चाचणी घेऊन त्यांचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे.यात प्रामुख्याने 24बाय7 अखंडित वीज वितरण. उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची देखभाल आणि वितरण रोहित्र व ग्राहक सेवांचे कार्यक्षम संचालन या सेवांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी हे मानांकन देण्यात आले आहे.महावितरणच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेनुसार ग्राहकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज हा कणा आहे. आयएसओ मानकांमुळे या भागातील ग्राहकांना आता अधिक दर्जेदार व तांत्रिक बिघाडमुक्त सेवा मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, उपकेंद्रातील कर्मचाèयांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या बदलांमुळेच हे यश शक्य झाले आहे. हे मानांकन म्हणजे कर्मचाèयांच्या एकजुटीचा विजय आहे.
अशाच प्रकारची प्रेरणा घेऊन इतर विभागांनीही उत्कृष्ट कामाचे दर्शन घडवावे, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे व मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन करण्यात आले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील पांडे, उपकार्यकारी अभियंता प्रफुल्ल वैद्य, सहाय्यक अभियंता नीलेश चामट व गिरीश मदाम यांच्यासह सर्व तांत्रिक कर्मचारी, सुरक्षा रक्षक व बाह्यस्रोत कर्मचाèयांनी या प्रक्रियेत अथक परिश्रम घेतले.