लोंबकळणार्‍या वीजवाहक तारांमुळे वाहनधारकांना मोठी अडचण

    दिनांक :18-Jan-2026
Total Views |
मानोरा,
Someshwar Nagar वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील रस्त्यावर लोंबकळत असलेल्या वीजवाहक तारांमुळे वाहनधारकांना दर दिवशी मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न लोंबकळणार्‍या या तारांमुळे पुढे येत आहे.
 

Someshwar Nagar  
सोमेश्वर नगर या गावाची लोकसंख्या जवळपास दोन हजार असून, गावातील नागरिकांना वीज वितरण करण्यासाठी आता पूर्वीसारखी धातूची तार नसून फायबरचे आवरण असणारी मुख्य केबलद्वारे ग्राहकाला वीज वितरित केल्या जात आहे. सोमेश्वर नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे समोर फायबरच्या केबल जागोजागी लोबकळत असून, येथील रस्त्यावरून ये जा करणारे मालवाहतूक व इतर वाहनांना अडथळा होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खांब उभारून लोबकळणार्‍या या फायबरच्या तारापासून नागरिक व वाहनधारकांना मुक्ती देण्याची मागणी अनेक महिन्यांपासून स्थानिक नागरिकांकडून करूनही वीज वितरण कंपनी प्रशासन याकडे सातत्याने डोळेझाक करीत असल्याचा संताप स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.
छायाचित्र - लोबकळणार्‍या केबल बांबुने उचलतांना वाहनधारक