अमेरिकेवर भारताचा पलटवार! डाळींवर 30 टक्के टॅरिफमुळे ट्रम्प प्रशासनात खळबळ

    दिनांक :18-Jan-2026
Total Views |
वॉशिंग्टन,  
india-tariff-on-us अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला ५० टक्के टॅरिफ अद्यापही कायम आहे. व्यापारातील तूट कमी करणे आणि भारताने रशियाकडून होणारी तेलखरेदी मर्यादित करावी, या उद्देशाने ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. मात्र, या पार्श्वभूमीवर आता भारताने अमेरिकेविरोधात उचललेल्या प्रत्युत्तरात्मक पावलामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगू लागली आहे.
 
india-tariff-on-us
 
भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या डाळींवर ३० टक्के आयातशुल्क लावले असून, हा निर्णय अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरला आहे. हा टॅरिफ ३० ऑक्टोबर २०२५ पासून लागू करण्यात आला आहे. india-tariff-on-us या निर्णयामुळे अमेरिकेतील शेतकरी आणि डाळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा दावा अमेरिकेतील काही खासदारांनी केला आहे. अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्याचे खासदार केव्हिन क्रेमर आणि मोंटानाचे खासदार स्टीव्ह डेन्स यांनी थेट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पत्र लिहून भारताच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. या पत्रात भारताने डाळींवरील ३० टक्के आयातशुल्क मागे घ्यावे, यासाठी अमेरिकेने दबाव टाकावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या खासदारांच्या मते, भारत ही अमेरिकन डाळ उत्पादकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे. अमेरिकेतून चणा, मसूर, मटर यांसारख्या डाळी मोठ्या प्रमाणात भारतात निर्यात केल्या जातात. मात्र, नव्या टॅरिफमुळे या निर्यातीवर गंभीर परिणाम होणार असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
दरम्यान, या पत्रव्यवहारानंतर ट्रम्प प्रशासन भारताच्या या टॅरिफवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाअंतर्गत ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर कडक टॅरिफ लादले आहेत. india-tariff-on-us अशा परिस्थितीत भारताने उचललेल्या या प्रत्युत्तरात्मक पावलामुळे पुढील काळात दोन्ही देशांतील व्यापारसंबंध कोणत्या दिशेने जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.