ग्वाटेमाला सिटी,
security-guards-hostage-guatemala मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला या देशात तुरुंगात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी उसळली आहे. ग्वाटेमालातील तीन वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये कैद्यांनी एकाच वेळी हिंसक उठाव करत अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी झालेल्या या गोंधळात सुमारे ४६ सुरक्षा रक्षक कैद्यांच्या ताब्यात अडकले असून, तुरुंग परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

तुरुंग प्रशासनाने काही टोळीप्रमुखांकडील विशेष सवलती काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतरच हा उठाव झाला असल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. security-guards-hostage-guatemala या निर्णयामुळे संतप्त झालेल्या कैद्यांनी दंगल घडवत सुरक्षा रक्षकांना ओलीस धरले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून संबंधित तुरुंगांच्या बाहेर राष्ट्रीय पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ग्वाटेमालाचे गृहमंत्री मार्को अँटोनियो विलेडा यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, सरकार कैद्यांशी संवाद साधण्यास तयार आहे, मात्र ओलीस सोडण्याच्या बदल्यात कोणत्याही अटी मान्य केल्या जाणार नाहीत. “आम्ही दहशतवादी किंवा संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी सौदेबाजी करत नाही. भीती निर्माण करणाऱ्या गटांना सरकार झुकणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये कैदी इतर तुरुंगात स्थलांतर करण्याची मागणी करत असल्याचे दिसून येत आहे. security-guards-hostage-guatemala सध्या तरी या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र, ओलीस सुटकेसाठी सरकारवर दबाव वाढत असून, संपूर्ण देशाचे लक्ष या गंभीर संकटाकडे लागले आहे.