जबलपूर,
car hits laborers : रविवारी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका भरधाव कारने १३ कामगारांना धडक दिली, त्यात दोघे जण ठार तर ११ जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना दुपारी २ वाजता बरेला पोलिस स्टेशन हद्दीतील सिग्मा कॉलनीसमोरील एकता चौकात घडली, तेव्हा कामगार जेवण करत होते.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक पल्लवी शुक्ला यांनी सांगितले की, अपघातात सहभागी कामगार रस्त्याच्या दुभाजकाची रेलिंग बसवण्याचे काम करत होते. दुपारी ते जेवण करत असतांना वेगाने येणाऱ्या कारने त्यांना चिरडले.
गाडीला नोंदणी क्रमांक नव्हता. एएसपी शुक्ला म्हणाले, "फरार कार चालकाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातातील बळी हे मांडला जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे आणि ११ जण जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. सर्व जखमींना जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेहही तेथेच ठेवण्यात येत आहेत. एका जखमीची प्रकृती गंभीर आहे." दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, गाडीला नोंदणी क्रमांक नव्हता.