'या' राज्यात ऊन सावलीचा खेळ कायम तरी हवामान खात्याचा 'अलर्ट'

    दिनांक :18-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Maharashtra weather, राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. थंडी, पाऊस आणि उकाडा या तिन्ही ऋतूंचा अनुभव नागरिक घेत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात तापमानात चढउतार होण्याचा इशारा दिला आहे. काही भागांत थंडीचा जोर कमी झाला असला तरी अचानक गारठा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Maharashtra weather,  
डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी अनुभवली जात होती, तर जानेवारी महिन्याच्या सुरुवातचाच अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. सध्या, दुपारनंतर ढगाळ वातावरण दिसून येत आहे आणि काही शहरांमध्ये उष्णतेचा पारा वाढत आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि आसपासच्या परिसरात थंडी कमी झाल्याचे जाणवत असले तरी हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
 
 

तीव्र थंडीची लाट
 
 
हवामान विभागाच्या Maharashtra weather  माहितीनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हरियाणातील नर्नुल येथे देशातील सर्वात कमी तापमान ३.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. महाराष्ट्रात, धुळे येथे किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, परभणीमध्ये तापमान १० अंश सेल्सिअस आहे. पुढील २४ तासांत राज्यात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.पुणे आणि परिसरात सध्या कमाल तापमान वाढत असून, पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर उष्णतेचा त्रास अधिक होत आहे. त्यामुळे काही भागांत दमट वातावरणाची अनुभूती नागरिकांना येत आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे सल्ले दिले जात आहेत.उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक भागांत तीव्र थंडीची लाट पसरली आहे. राजधानी दिल्लीमध्ये दाट धुके पडत असून, वाहतूक व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ आणि २३ जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे. या बदलांचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होऊ शकतो.तसेच, मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईत सायंकाळच्या वेळी आकाश धूसर दिसत आहे, आणि प्रदूषणामुळे श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रदूषण आणि हवामानातील बदल यांच्या एकत्रित परिणामामुळे नागरिकांच्या आरोग्याची स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
 
 
विशेषतः लहान मुले, वृद्ध Maharashtra weather  नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा आणि वातावरणातील बदलांबद्दल सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या वातावरणात काळजी घेणे आणि योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पुढील काही दिवसांमध्ये राज्यात आणखी हवामानातील बदल होण्याची शक्यता आहे, आणि नागरिकांनी त्यानुसार तयारी करणे आवश्यक आहे.