विरोधी पक्षांचे आव्हान ढासळले

    दिनांक :18-Jan-2026
Total Views |
नागपूर,
municipal elections nmc महापालिकेवरील सत्तेपासून यंदाही भाजपाला दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. तो फसला नसला तरी केविलवाणा ठरला. ही ठिणगी भविष्यात वणवा ठरू नये, याची काळजी भाजपाला घ्यावी लागणार आहे.
 

municipal elections nmc 
या आधी 2017 मध्ये महापालिका निवडणूक झाली होती. त्यानंतर काल झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपला गड राखला. संपूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाला सहजतेने ती जिंकता आली नाही. कारण, काँग्रेससह विरोधी पक्षांनी उभे केलेले आव्हान. केंद्र, राज्यात व महापालिकेतही सत्ता (मधला तीन वर्षांचा काळ सोडल्यास) असलेल्या भारतीय जनता पार्टीने अनेक कोट्यवधींची विकासकामे केली, हे वास्तव आहे.
काँग्रेससह विरोधी पक्ष सत्तेत नसल्याने विकासकामे करण्याचा प्रश्नच नव्हता. राजकीय, वैचारिक आयुधांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप), आम आदमी पार्टी, बहुजन समाज पक्ष, एमआयएम, एआयएमएल, शिवसेना (उद्धव ठाकरे), रिपाईं विविध गट, जन बदलाव पार्टी, जय विदर्भ पार्टी, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पार्टी, मनसे व इतर विरोधी पक्ष रिंगणात उतरले. महायुतीत घटक पक्ष शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँगेसने (अप) या निवडणुकीत काही ठिकाणी भाजपाविरुद्ध उमेदवार उभे केले. काही ठिकाणी आघाडी केली.
 
 
मागील काळात महापालिकेत बसपाचे 9, काँग्रेसचे 29 नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक होता. या पार्श्वभूमिवर या सर्वच विरोधी पक्षांनी विविध बाबी, मुद्यांचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातच यंदा खुुल्या गटात इतर राखीव गटातील व्यक्तींना उमेदवारी, दुसèया प्रभागातील व्यक्तींना उमेदवारी, एकाच कुटुंबात पुन्हा उमेदवारी, जुन्या कार्यकर्त्यांना डावलणे आदी कारणांवरून यंदा भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड नाराजी होती. काहींनी बंडखोरी केली. भाजपला हे आव्हानही होतेच.
 
 
याचा फायदा घेत काँग्रेेससह विरोधी पक्षांनी भाजपापुढे आव्हान ठेवले होते. अशा वातावरणात मतदानही झाले. प्रत्यक्षात मतमोजणीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपाला सत्तेपासून रोखण्याचा विरोधी पक्षाचा प्रयत्न केविलवाणा ठरल्याचे उघड झाले. मुळात विरोधी पक्षाचे आव्हान केेवळ हवा ठरली. त्यांनी आरोपाच्या फैरी हवेतच झाडल्या. मतदानासाठी मतदाराला आणण्याचा काँग्रेस सोडल्यास इतर विरोधी पक्षांना जमलेच नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या रूपात का होईना तेवढे बळच त्यांच्यात नव्हते. खरं म्हणजे या नाराजीचा पराभवाच्या रूपात भाजपाला प्रचंड फटका बसला असता. उलट भाजपाच्या सर्वच नेत्यांनी नाराज, खचलेल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून समजूत घातली. तरीही बोटावर मोजण्या इतक्यांनी प्रत्यक्ष बंडखोरी केली, हा भाग वेगळा.
 
 
विकासकामे जनतेपुढे होतीच. काहींचा अपवाद सोडला तर बहुतांश नवख्या उमेदवारांचा विजय हा मतदारांच्या पक्षनिष्ठेमुळे झाला, हे वास्तव आहे. काहीही झाले तरी ‘भाजपा हा पक्ष महत्त्वाचा आहे’, ही निष्ठा हेच प्रचंड भांडवल भाजपाजवळ आहे. विरोधी पक्षांची ताकद कमी पडली. 38 प्रभागातील 151 जागांवर भाजपाचे 102, बसपाचा फक्त 1, काँग्रेस 34, आप 0, राष्ट्रवादी काँग्रेेस (अप) 1, शिवसेने (शिंदे) 1, मनसे 0, शिवसेने (उबाठा) 2 उमेदवार निवडून आले. एमआयएमचे 6, मुस्लिम लिगचे 4 उमेदवार विजयी झाले. या विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी घेतलेली मते व पराभूत उमेदवाराची मते यात फारसा फरक नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (शप), आम आदमी पार्टी, रिपाईं विविध गट, वंचित बहुजन आघाडी, मनसे व इतर सर्व विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहता निवडणुकीत सत्तापक्षाला आव्हान उभे करण्यास सपेशल ढासळले, हे स्पष्ट होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अप), बसप, शिवसेना (उबाठा) यांचा प्रयत्न केविलवाणा ठरला, अशीच चर्चा मतदारांमध्ये आहे.