दोन पत्नी सोडून तिसरीसोबत राहायचा रेल्वे कर्मचारी; वादातून केली तिची हत्या आणि...

    दिनांक :18-Jan-2026
Total Views |
झाशी,   
jhansi-live-in-partner-murder झाशीतील सीपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्रह्मनगर परिसरात एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतक्यावरच न थांबता, आरोपीने मृतदेहाचे अवयव जाळून हाडे आणि राख एका बॉक्समध्ये भरली आणि तो बॉक्स स्वतःच्या मुलामार्फत लोडिंग ऑटोने पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑटोचालकाला संशय आल्याने संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
 
jhansi-live-in-partner-murder
 
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मनगरमध्ये राहणारा निवृत्त रेल्वे कर्मचारी बृजभान याने आपल्या लिव्ह-इन पार्टनर प्रीती (वय ४०) हिची हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि घरातच एकेका अवयवाला आग लावत तो जाळत राहिला. काही अवयव, हाडे आणि राख एका निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये भरून तो ते पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बाहेर नेणार होता. शनिवारी रात्री उशिरा बृजभानने एका लोडिंग ऑटोची बुकिंग केली. jhansi-live-in-partner-murder त्या ऑटोमध्ये बॉक्स ठेवून तो स्वतः मागून दुसऱ्या वाहनाने येत होता. मात्र ऑटोचालक जयसिंह पाल याला बॉक्समधून दुर्गंधी येत असल्याचे आणि त्यातून पाणी गळत असल्याचे जाणवले. त्यामुळे त्याला संशय आला आणि त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बॉक्स उघडला असता त्यात अर्धवट जळालेले मृतदेहाचे तुकडे, हाडे आणि राख आढळून आली. या दृश्याने पोलिसांनाही धक्का बसला. jhansi-live-in-partner-murder ऑटोचालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी थेट आरोपीच्या घरावर धाड टाकली आणि बृजभानला ताब्यात घेतले. चौकशीत मृत महिला प्रीती असल्याचे स्पष्ट झाले. ती बृजभानसोबत ब्रह्मनगरमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दरम्यान, या प्रकरणात गीता नावाची महिला समोर आली. चौकशीत तिने सांगितले की तिचा पती रामसिंह हा रेल्वेतून निवृत्त झाला असून ती त्याची दुसरी पत्नी आहे. रामसिंह तिसऱ्या एका महिलेसोबत राहत होता आणि ती महिला सतत पैशांची मागणी करत होती. याच कारणामुळे वैतागून तिची हत्या केल्याचे पतीने तिला सांगितल्याचा दावा गीताने केला आहे.
पत्नीने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्या भाड्याच्या खोलीची तपासणी केली असता, तेथे गुन्हा घडल्याचे प्राथमिक पुरावे आढळून आले. फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावून नमुने गोळा करण्यात आले आहेत. मृत महिलेच्या पूर्व पतीकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.