शेफाली जरीवालाच्या मृत्यूमागे काळी जादू? पती पराग त्यागीचा धक्कादायक खुलासा

    दिनांक :18-Jan-2026
Total Views |
मुंबई,  
shefali-jariwalas-death ‘बिग बॉस 13’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि ‘कांटा लगा’ गर्ल म्हणून ओळखली जाणारी शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरले आहे. तिच्या जाण्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांवर शोककळा पसरली असून पती पराग त्यागी अजूनही या धक्क्यातून सावरू शकला नाही. पत्नीच्या आठवणींमध्ये जगणाऱ्या पराग यांनी नुकताच शेफालीच्या मृत्यूबाबत एक खळबळजनक दावा करत सर्वांनाच चकित केले आहे.
 
shefali-jariwalas-death
 
अभिनेता पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना पराग त्यागीने शेफालीवर ‘काळी जादू’ करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला. हा दावा करताना ते पूर्णपणे गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “अनेक लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, पण मी ठेवतो. जिथे देव आहे, तिथे वाईट शक्तीही असतात. काही लोक स्वतःच्या दुःखाने नव्हे, तर दुसऱ्याच्या आनंदाने त्रस्त असतात,” असे पराग म्हणाला. पुढे बोलताना त्यानी, “मला वाटत नाही, मला खात्री आहे की कुणीतरी हे केल आहे. नाव घेऊ शकत नाही, पण काहीतरी चुकीच आहे हे मला जाणवत होत,” असेही त्यानी सांगितले. परागच्या म्हणण्यानुसार, शेफालीसोबत असे काहीतरी घडत असल्याची जाणीव त्याला एकाहून अधिक वेळा झाली होती. shefali-jariwalas-death “पूजेला बसलो की मन अस्वस्थ व्हायचे. ही दुसरी वेळ होती. शेफाली खूप आनंदी स्वभावाची होती, पण यावेळी तिच्यात काहीतरी बदल जाणवत होता. नेमकी लक्षण सांगण कठीण आहे, पण तिला स्पर्श करताच समजायच की काहीतरी बरोबर नाही. यावेळी परिस्थिती जरा गंभीर वाटल्याने मी एक पूजा केली होती,” असे त्यानी सांगितले.
दरम्यान, 27 जून रोजी शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तिच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे विशेष लोकप्रिय झालेल्या शेफालीने अल्प काळातच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. shefali-jariwalas-death परागने केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा शेफालीच्या मृत्यूभोवती चर्चांना उधाण आले आहे.