डम्पींग यार्डमध्ये कचऱ्याची ट्राॅली अंगावर पडून मजूर ठार

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
dumping yard कचरा उचलणाऱ्या महापालिकेच्या घंटा गाडीवर काम करत असताना कचऱ्याची ट्राॅली अचानक अंगावर काेसळ्याने कंत्राटी साई कामगार खाली दबून मृत्यू झाला. सिद्धार्थ घाेडके (39) असे या दुर्दैवी घटनेत दगावेल्या मजुराचे नाव आहे. महापालिकेच्या नेहरू नगर झाेन अंतर्गत बुधवारी बाजार परिसरात रविवारी सकाळी सिद्धार्थ घाेडके हे कर्तव्यावर तैनात हाेते. महापालिकेच्या घंटा गाडीवरील मजूर कचरा उचलत असताना ट्राॅली सिद्धार्थ यांच्या अंगावर येऊन काेसळली. त्या घाेडके हा कंत्राटी मजूर कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावले. सिद्धार्थ हे महापालिकेच्या नेहरू नगर झाेन अंतर्गत ए. जी. कंपनीत साई कामगार म्हणून काम करत हाेते. ते रविवारी सकाळी इतर सहकाऱ्यांसह बुधवारी बाजार परिसरातून कचरा उचलून भांडेवाडी कचरा डंपिंग यार्डकडे जाणार हाेते.यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. सिद्धार्थ यांना गंभीर दुखापत झाल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढत मेडिकलच्या ट्राॅमा सेंटरमध्ये दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. सक्कदरा पाेलिसांनी पंचनामा करत पुढील कारवाई सुरू केली.

डम्पिंग यार्ड  
 
 
 
नातेवाईकांचा संताप
या अपघातात दगावलेले सिद्धार्थ हे घाेडके कुटुंबातले कर्ते व्यक्ती हाेते. त्यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांसह अन्य मजुरांनी मृतदेहासह सक्कदरा पाेलिस ठाणे गाठले. नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी पाेलिस ठाण्यात घाेषणाबाजी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण हाेते.
कुटुंबातील सदस्याला नाेकरी द्या
मृत मजूर घाेडके यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नाेकरी द्यावी. तसेच कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी परशू ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदाेलन केले.dumping yard मागणी मान्य न झाल्यास अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा आंदाेलकांनी पवित्रा घेतला. आंदाेलकाच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.