विविध समित्या व स्थायी समित्यांची निवड
बुलढाणा,
Buldhana Municipality बुलढाणा नगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची व शहराच्या सर्वांगीण विकासात निर्णायक भूमिका बजावणारी स्थायी समिती दि. १९ जानेवारी रोजी अधिकृतरीत्या गठीत करण्यात आली.आ. संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी शरद पाटील यांच्या उपस्थितीत, नगराध्यक्ष पूजा गायकवाड, गटनेते मृत्युंजय गायकवाड, उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे, नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश पांडे तसेच सर्व नगरसेवक यांच्या समक्ष स्थायी समितीची रचना करण्यात आली.

Buldhana Municipality शहराच्या प्रशासनात कणा समजल्या जाणार्या या समितीकडे अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष पूजा संजय गायकवाड, उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, बांधकाम सभापती —पुष्पा शिवाजी धुड, शिक्षण सभापती दिपक दशरथ सोनुने, आरोग्य सभापती इशरत परविन म. अझहर, महिला व बालकल्याण सभापती इंदुताई शामराव घट्टे, महिला व बालकल्याण उपसभापती सविता प्यारेलाल हडाळे, पाणीपुरवठा सभापती नयनप्रकाश सुखदेव शर्मा, स्थायी समिती सदस्य सतीश बरडे, अशोक इंगळे, प्रशांत जाधव या नव्याने गठीत झालेल्या समितीमुळे बुलढाणा शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, बांधकाम आदी महत्वाच्या विभागांमध्ये गती येणार असून नागरिकांच्या समस्या अधिक तत्परतेने सोडविल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.