जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था तेजीत; IMF कडून वाढीचा भक्कम अंदाज

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,  
imf-on-indias-economy जगभरात राजकीय घडामोडी, आर्थिक अस्थिरता आणि बाजारातील अनिश्चितता वाढलेली असतानाही भारतीय अर्थव्यवस्था मात्र स्थिर आणि वेगवान वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या ताज्या अहवालानुसार, भारताची अर्थव्यवस्था 2025 मध्ये 7.3 टक्क्यांनी वाढेल, तर 2026 आणि 2027 मध्ये ही वाढ सरासरी 6.4 टक्क्यांच्या दराने राहण्याचा अंदाज आहे.

imf-on-indias-economy 
 
जागतिक पातळीवर अनेक विकसित आणि विकसनशील देश मंदी, महागाई आणि कमी मागणीच्या समस्यांशी झुंज देत असताना भारताची ही कामगिरी विशेष लक्षवेधी ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर, रेटिंग एजन्सी केअरएजनेही अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी सुमारे 7 टक्क्यांनी वाढू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. imf-on-indias-economy अवघ्या दोन दिवसांत अर्थव्यवस्थेसाठी ही सलग दुसरी सकारात्मक बातमी ठरली आहे. आयएमएफच्या अंदाजानुसार जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 2025 आणि 2026 मध्ये सुमारे 3.3 टक्के, तर 2027 मध्ये 3.2 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहू शकतो. या तुलनेत भारताची विकासगती लक्षणीयरीत्या पुढे असल्याचे चित्र आहे.
आयएमएफने भारताच्या मजबूत आर्थिक कामगिरीमागे काही महत्त्वाची कारणे अधोरेखित केली आहेत. imf-on-indias-economy देशांतर्गत मागणी सातत्याने वाढत आहे, सरकारी गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे, तसेच खासगी क्षेत्राकडून भांडवली खर्चात हळूहळू वाढ होत आहे. याशिवाय, 2025 मध्ये अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये काहीशी घट झाल्याने महागाईचा दबावही कमी झाला आहे. बदलत्या व्यापार धोरणांमुळे गुंतवणुकीला चालना मिळाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
इतर प्रमुख देशांचा विचार केला, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था 2026 मध्ये सुमारे 2.4 टक्क्यांनी, चीनची 4.5 टक्क्यांनी आणि युरो क्षेत्राची केवळ 1.3 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. इतर विकसनशील देशांची सरासरी वाढ 4.2 टक्क्यांच्या आसपास असताना, भारताची गती त्यापेक्षा बरीच पुढे असल्याचे आयएमएफच्या अहवालातून स्पष्ट होते. आयएमएफने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, “2025 साठी भारताचा विकासदर 0.7 टक्के अंकांनी वाढवून 7.3 टक्के करण्यात आला आहे. यावरून आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी झाल्याचे दिसून येते.”