पोदार शाळेतील विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
एक मूठ धान्य गरजवंतांसाठी

पुसद, 
विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेचे भान राखत येथील एका अनाथाश्रमाला तसेच Donating grain to the old age home वृद्धाश्रमाला धान्य भेट दिले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजातील गरजू घटकांप्रती सहानुभूती व मदतीची भावना व्यक्त केली. विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलद्वारे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी वन फिस्ट ग्रेन या नावाने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे व क्षमतेनुसार धान्य आणले. छोटासा वाटणारा प्रत्येक सहभाग एकत्र आल्यास मोठा बदल घडवू शकतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पोदार स्कूल मधील शिक्षकांनीही आवश्यक वस्तूंचे दान केले.
 
 
y18Jan-Podar
 
Donating grain to the old age home 17 जानेवारी रोजी संकलित साहित्याचे वितरण चंदू नाईक ज्येष्ठ नागरिक गृह पुसद येथे करण्यात आले. त्यानंतर स्वर्गीय विद्यरत्न वडते बालगृह (अनाथालय) येथे भेट देण्यात आली. या उपक्रमाचे नेतृत्व पोदार स्कूलच्या वरिष्ठ व कनिष्ठ विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी तसेच वर्ग प्रतिनिधींनी केले. यावेळी उपप्राचार्य व शिक्षक उपस्थित होते. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी वृद्ध व बालकांशी संवाद साधत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवले. अनाथालय व वृद्धाश्रमाचे अधिकारी मोरेश्वर आडे व आशिष राठोड यांनी विद्यालंकार्स पोदार लर्न स्कूलच्या व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे आभार मानले. शाळेचे अध्यक्ष शरद मैंद, सचिव सूरज डुबेवार, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल, कोषाध्यक्ष मनीष अनंतवार, सहसचिव संगमनाथ सोमावार, प्राचार्य राधा यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.