...अखेर कुख्यात क्रिकेट बुकी बाेमाला अटक

- डान्सबारमध्ये तरुणीशी छेडखानीचा गुन्हा

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
notorious cricket bookie boma बारमध्ये डान्स करणाऱ्या तरुणीला पिस्तूल दाखवून अश्लील चाळे करणारा कुख्यात क्रिकेट बुकी बोमा ऊफर् आशिष कुबडे याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. पोलिसांना तो एका कारमध्ये बसल्याचे दिसल्यानंतर पथकाने पाठलाग करत त्याला नाट्यमयरित्या अटक केली.
 

crime 
 
बोमा हा कुख्यात क्रिकेट बुकी असून कोट्यवधीमध्ये क्रिकेट सामन्यावर खायवाडी करतो. शहरातील अनेक छोट्या क्रिकेट बुकींना आर्थिक पुरवठा करण्यासाठी बोमाची ओळख आहे. बोमाचे काही पोलिस अधिकारी आणिक कर्मचाèयांशी अर्थपूर्ण संबंध असल्याचीसुद्धा चर्चा आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकाèयांच्या आशिर्वादाने अजुनही डान्सबार सुरु असल्याची चर्चा असून तेथून मोठ्या प्रमाणात मलिदा लाटत असल्याची चर्चा आहे. गेल्या महिन्यात सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी इंद्रकुमार घीसूलाल अग्रवाल (52) या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी बोमाविरुद्ध खंडणीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. अग्रवाल कपडे आणि रिअल इस्टेट व्यवसाय करतात. बोमा हा शहरातील सर्वात चर्चित आणि वादग्रस्त बुकींपैकी एक आहे. बोमा आणि अग्रवालची भेट एका मित्रार्माफत झाली होती. गेल्या वर्षी जानेवारीत बोमाने अग्रवालकडे 1 कोटी 20 लाख रुपये उसणे मागितले. पैसे देण्यास नकार दिला असता बोमाने त्याला धमकावणे सुरू केले. बोमाने अग्रवालला गोळी घालून ठार मारण्याची धमकी देऊन 20 लाखांची खंडणी मागितली.notorious cricket bookie boma सततच्या धमक्यांमुळे अग्रवालने पोलिस तक्रार दाखल केली. दरम्यान, बोमाने एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत एका बारमध्ये बारबालेशी अश्लील चाळे केले होते. त्याने गायिकेला पिस्तूल दाखवून धमकावले. ऑर्केस्ट्रा मॅनेजरच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी दागिन्यांच्या दुकानासह विविध ठिकाणी छापे टाकले, परंतु तो सापडला नव्हता. सांगण्यात येते की, पोलिसांनी बोमावरास आवळण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. लवकरच त्याच्या कठोर प्रतिबंधक कारवाई केली जाईल.