आ. कुणावार यांचा महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना फोन
समुद्रपूर,
अवघ्या काही दिवसातच महिलांमध्ये लोकप्रिय झालेल्या laḍaki bahiṇ yojana लाडकी बहिणी योजनेत ३१ डिसेंबरपुर्वी ऑनलाईन ईकेवायसी करताना चुक झाल्याने अनेक महिलांच्या खात्यात अनुदानची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे अनेक मात्र महिलांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. त्याची दखल घेऊन आ. समीर कुणावार यांनी १९ जानेवारीला समुद्रपूर पंचायत समितीत पाणी पुरवठा आढावा बैठकीतून थेट महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना फोन करून ईकेवायसीतील चुकीमुळे अनुदानापासून वंचित लाडया बहिणींचे पैसे जमा करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी केली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पात्र महिलांसाठी laḍaki bahiṇ yojana लाडया बहीण योजनेतून समाविष्ट पात्र महिलांना ऑनलाईन ईकेवायसी करण्याची मुदत ३१ डिसेंबरला २०२५ पर्यंत दिली होती. या काळात अनेक महिलांनी केवायसी केली. मात्र, अनेक महिलांपर्यंत दुसर्यांदा ईकेवायसी करण्यासंबंधी माहिती मिळालीच नाही तर अनेक पात्र महिलांनी ईकेवायसी करताना दिलेल्या प्रश्नांची चुकीचे उत्तर दिल्याने त्यांच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात शासनाकडून दिलेल्या अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे ऑनलाईन ईकेवायसी मुळे त्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागले आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील माहितीला ग्राहृय धरून दोन महिन्याचे पैसे जमा करावे तसेच परत ऑनलाईन ईकेवायसी पोर्टल ओपन करून त्यात सुटसुटीत प्रश्नांचा समावेश करावा अशी मागणी केली. ना. तटकरे यांनी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर या विषय मांडून यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.