सारांश पांडेला इंटरनॅशनल जीके ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Science Olympiad Foundation सायन्स ऑलम्पियाड फाउंडेशन तर्फे घेतलेल्या इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, पंडित बच्छराज व्यास विद्यालय इंग्लिश मिडीयम शाळेचा सहावी वर्गाचा विद्यार्थी सारांश पांडे याने या परीक्षेत प्रावीण्य मिळवले आहे. त्याला सुवर्ण पदक व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे.
 
Science Olympiad Foundation
 
शाळेचे मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांनी सारांश याला सुवर्ण पदक व सन्मानपत्र देऊन सत्कार केला. सारांश पांडेच्या या यशाबद्दल भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गजानन पिलपिले, सचिव उपेंद्र जोशी, Science Olympiad Foundation तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सौजन्य: रोशन जोशी, संपर्क मित्र