राष्ट्रीय युवादिनी नशामुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
पुसद विधी सेवा समिती व तालुका वकील संघ

पुसद,
राष्ट्रीय विधी सेवा समिती, नवी दिल्ली यांच्या निर्देशांनुसार, 5 ते 12 जानेवारी अंतर्गत Nasha mukti janjagr̥ati rally नशामुक्त भारत अभियानांतर्गत तालुका विधी सेवा समिती, पुसद यांच्यामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती, पुसद व पुसद वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुसद शहरात नशामुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
y19Jan-Janjagruti
 
Nasha mukti janjagr̥ati rally या रॅलीत पुसद न्यायालयातील सर्व न्यायाधीश, पुसद वकील संघाचे सर्व ज्येष्इ व कनिष्ठ सदस्य तसेच श्रीराम आसेगावकर विद्यालय, वत्सलाबाई महिला महाविद्यालय, नवजीवन इंग्लिश मिडीयम स्कुल, फुलसिंग नाईक महाविद्यालय व गुलाम नबी आझाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. समाजातील सर्व घटकांमध्ये नशामुक्तीची जागृती करणे हा रॅलीचा उद्देश होता. ही रॅली तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्ष एसजे रामगडीया यांच्या अध्यक्षतेत पार पाडली.
 
 
Nasha mukti janjagr̥ati rally  रॅलीमध्ये पुसद न्यायालयातील तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 एसएन शाह, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एसवाय कदम, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर जीजी चोंडे, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर व्हीडी बिरहारी, 3 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर एबी जाधव, 4 थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर एयु यादव, वकील संघाच्या अध्यक्ष अ‍ॅड. वनिता पवार, उपाध्यक्ष अ‍ॅड जेएस देशमुख, सचिव अ‍ॅड. तनवीर खान, कोषाध्यक्ष अ‍ॅड. अभिषेक रूडे, कार्यकारणी सदस्य त्याचप्रकारे वकील संघाचे सर्व सदस्य व न्यायालयीन कर्मचाèयांनी यशस्वी आयोजन केले होते.