यवतमाळ,
माध्यमिक शिक्षण मंडळ सचिव तथा अमरावती विभाग शिक्षण उपसंचालक Neelima Take नीलिमा टाके यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची आढावा सभा उबुंटू इंग्लिश स्कूल, यवतमाळ येथे झाली. या सभेस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यवतमाळचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रकाश मिश्रा, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किशोर पागोरे, माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावतीच्या उपसचिव कन्नमवार, उपशिक्षणाधिकारी योगेश डाफ, प्रदीप गोडे, वंदना नाईक, डॉ. शिल्पा पोलपेल्लीवार यांची उपस्थिती लाभली.
Neelima Take जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यवतमाळचे अधिव्याख्याता डॉ. राठोड, पुनीत मानकर, धम्मरत्न वायवळ, जिल्हा संगणकप्रोग्रामर संदीप शिरभाते, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शाळेचे अध्यक्ष पांडुरंग खांदवे, उपाध्यक्ष संभाजी राणे तसेच मुख्याध्यापक बोरखडे हे मान्यवर उपस्थित होते. सभेत निपून महाराष्ट्र अभियान, नवभारत साक्षरता कार्यक्रम, यू-डायस (णॄखडए) माहिती अद्ययावत करणे, अपार आय.डी. निर्मिती, आधार अद्ययावतीकरण तसेच इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षांचे नियोजन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सभेचे संचलन अनिल शेंडगे, विस्तार अधिकारी (शिक्षण), माध्यमिक शिक्षण विभाग यांनी केले. ही सभा यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी दिशादर्शक ठरली.