नागपूर,
mavashi kelkar प्रत्येक स्त्री ही कुटुंबवत्सल असलीच पाहिजे परंतु तिची कुटुंबाची चाकाेरी ही संकुचित राहता कामा नये. हा समाजही एक कुटुंबच आहे आणि आपल्या मातृत्वरूपी शक्तीतून प्रत्येक स्त्री ही राष्ट्राला दिशा देऊ शकते हा विचार बाळहून पारतंत्र्य काळात राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून देशकार्यासाठी आणि स्त्रियांना आत्मभान देणाèया समितीच्या आद्य प्रमुख संचालिका वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर यांच्या राष्ट्रकार्यावर आधारित उषःकाल कांतिकारी पर्वाचा हा नाट्यानुभव प्रेक्षकां साठी स्मरणीय राहिला.
चाैथीपर्यंत शिकलेल्या लक्ष्मीबाईं समाजाकडे सुरुवातीपासूनच डाेळसपणे बघणाèया हाेत्या. रा. स्व. संघाच्या शाळेत जाणाèया त्यांच्या मुलांच्या कवायती बघताना स्त्रियांसाठीही असे काहीतरी व्यासपीठ हवे या विचाराची रुजवात, पुढे सरसंघचालक डाॅ. हेडगेवारांशी झालेल्या दीर्घ चर्चेनंतर 29 ऑक्टाेबर 1936 ला विजयादशमीला रा ष्ट्र सेविका समितीची स्थापना व विस्तार, त्यासाठी सायकल शिकणे, स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात उसळलेल्या दंगली, सिंध प्रांतातील हिंदू स्त्रियांसाठी कराचीला जाण्याचा घेतलेला धाडसी निर्णय, महात्मा गांधींच्या विचाराचा प्रभाव, सावरकरांची भेट, गांधी हत्या व आणिबाणीच्या काळातील समितीची भूमिका, समितीला गावागावात पाेहचविण्यासाठी प्रवचनांचा आधार, त्यासाठी रामायणाचा अभ्यास, त्या मानधनातून नागपुरात उभी राहिलेले अहिल्या मंदिर हा प्रवास अतिशय प्रवाही पद्धतीने नाटकातून मांडण्यात आला. मावशींच्या भूमिकेतील वीणा गाणू यांचा संयमित अभिनय आणि त्याला इतर कलाकारांची जाेड यामुळे नाटक वेगळी छाप साेडून गेले. आद्यप्रह्मवादिनी ाऊंडेशनद्वारे आयाेजित या नाटकीची संकल्पना डाॅ. वृषाली शिलेदार यांची हाेती. लेखक डाॅ. छाया नाईक तर दिग्दर्शन संजय पेंडसे आणि डाॅ भाग्यश्री चिटणीस यांचे हाेते. संगीत शैलेश भलमे, प्रकाशयाेजना ऋषभ धापाेडकर, ध्वनी शेखर राऊळकर तर संगीत स्वाती पटवर्धन यांचे हाेते.