हिंगणघाट,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष, मकर संक्रमण उत्सव तसेच Rashtra Sevika Samiti राष्ट्र सेविका समितीचा शताब्दीकडे सुरू असलेली वाटचालीच्या निमित्ताने राष्ट्रसेविका समिती हिंगणघाट शाखेच्या वतीने रविवार १८ रोजी गोकुळधाम मैदाना वरून सेविकांनी पथ संचालन काढण्यात आले.
शहरातील गोकुलधाम - तुकडोजी पुतळा, अॅसिस बँक, पारीख भवन, एसएसएम शाळा, कारंजा चौक, मोहता चौक, महावीर कलेशन, जैन मंदिर, गणपती मंदिर ते परत गोकुलधाम मैदान येथे समारोप झाला. पथसंचालनात रस्त्यावर दूतर्फा जमलेल्या नागरिकांनी या पंथ संचलनाचे पुष्पवर्षाव करून स्वागत केले. पथसंचालनात Rashtra Sevika Samiti राष्ट्रासेविका समितीच्या सेविका, स्वयंसेवकांनी सहकार्य केले.