रिद्धी-सिद्धी गणेश मंदिरात होणार श्रीगणेश जयंती उत्सव

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
उमरखेड, 
विदर्भ-मराठवड्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या Riddhi-Siddhi Ganesha Temple उमरखेड शहरातील चौभारा देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिद्धी-सिद्धी गणेश मंदिरात यंदाही परंपरेनुसार श्री गणेश जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. हा उत्सव 22 ते 24 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, 22 जानेवारी रोजी सकाळी काकडा आरतीने उत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर भाविकांच्या सहभागातून श्री गणपती अथर्वशीर्ष पठण होणार आहे. सकाळी 9.30 वाजता मंदिर व्यवस्थापन प्रमुख संध्या व दीपक देशमुख यांच्या हस्ते श्रीची महापूजा होणार आहे. दुपारच्या सत्रात श्री बसवेश्वर महिला भजनी मंडळाकडून भजन सेवा तर रात्री अनुपमा देशकर यांचे हरिकीर्तन होणार आहे .
 

y18Jan-Chaubhara 
 
Riddhi-Siddhi Ganesha Temple  शुक्रवार, 23 जानेवारी रोजी सकाळी माधुरी व सुरेंद्र कोडगिरवार यांच्या हस्ते महापूजा. दुपारच्या सत्रात नवनिर्वाचित नप अध्यक्ष तेजश्री संतोष जैन व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा अ‍ॅड. विलास देवसरकर यांच्या अध्यक्षतेत सत्कार होणार आहे. रात्री अनुपमा देशकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. शनिवार, 24 जानेवारी रोजी सकाळची महापूजा डॉ. वैदही व डॉ. विवेक रामचंद्र कुळकर्णी या दाम्पत्याच्या हस्ते होणार आहे. बाबुराव तेरकर यांचे संप्रदायी काकडा कीर्तन, गोपालकाला व महाआरती होऊन महाप्रसादाने तीन दिवसांच्या उत्सवाची सांगता होणार आहे. उत्सव काळात दररोज सकाळी श्री बसवेश्वर देवस्थान येथून गणपती मंदिरापर्यंत काकडा भजन दिंडी काढण्यात येणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.