आज गाव एकाच दिशेेने चालत होतं... केजाजी महाराजांच्या दिंडी आणि पालखीच्या मागे...
माऊली... माऊली...च्या गजरात टाळ मृदूंगाच्या ठेयावर बोरतिरावरची घोराडनगरी क्षणात वारीत सामील झाली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल नाम जप... Saint Kejaji Maharaj संत केजाजी नामाचा जयघोषात ३० हजार वारकर्यांची पावलं एक पावलीत सहभागी झाली. दिंडी, पालखी व रिंगण सोहळ्याने पंढरीचा भास होऊ लागला. नजर जाईल तिथे भतांचा मळाच दिसत होता. गावकरी त्यांच्या आदरातिथ्यासाठी धावपळ करीत होते. केजाजी महाराज पुण्यतिथी सार्या गावाचा महोत्सव झाला होता.
Saint Kejaji Maharaj सकाळी ९ वाजता ढोल ताशांच्या गजराने सोहळ्याची सुरुवात झाली. ११ वाजताच्या ठोयाला टाळ मृदंगाच्या ठेयावर हरिनामाच्या जयघोष आणि दीडशेहून अधिक भजनी मंडळांनी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. दिंडी बोर तिरावरून जात असताना जणू आपण चंद्रभागेतिरी असल्याचा भास होत होता. गावातील रस्ते भाविकांनी फुलले होते. पालखीवर फुलांचा वर्षाव होत होता. संत नामदेव महाराज समाधी मैदानावर रिंगण सोहळा सुरू होताच टाळ मृदंगाचा एकाच वेळी निनाद झाला. शंभराहून अधिक पखवाज वादक, असंख्य टाळकर्यांनी माऊली माऊली संत केजाजी महाराज की जय असा गजर केला अन् घोराड नगरी दुम दुमुन गेली. हा सोहळा भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. साधू संत येती घरा तो ची दिवाळी दसरा असा अनुभव गावातील मार्गाने दिंडी सोहळा सुरू असताना येत होता. जागोजागी भजन मंडळातील विणेकर्यांचे पाय धुऊन औक्षण केले जात होते. या दिंडी पालखी सोहळ्यात जणू आळंदी ते पंढरपूर वारीत असल्याचा भास होत असल्याचा भास होत असल्याच्या प्रतिक्रिया गावागावातून आलेल्या भतांनी दिल्या. दिंडी परिक्रमा मार्गाने फराळ व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. सेलूवरून येणारे सर्व रस्ते भाविकांनी फुलले होते. या दिंडी सोहळ्यात भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यातील भजनी मंडळ सामील झाले होते. घरोघरी असणारे पाहुणे मुकामी आहेत. घराघरात दिवाळी असल्यागत पै पाहुणा आलेला आहे. सासरी गेलेल्या लेकी या सोहळ्याच्यानिमित्ताने माहेरी आल्या आहेत. गावकरी जात, पात, धर्म, गरिबी, श्रीमंती विसरत या भतीच्या सोहळ्यात आणि गावच्या आराध्य दैवता चरणी आपली सेवा अर्पण करीत आहेत.