Suvarṇa jayanti shahari vikas mahaprakalp yojana सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (राज्य स्तर) योजने अंतर्गत शहर विकासासाठी रस्ते विकास प्रकल्पाचे 38 कोटी 56 लाख रुपयांची रस्त्याची कामे मुदत संपूनही संबंधित कंत्राटदारांनी अर्धवट अवस्थेत सोडून दिल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगर परिषदेवर नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. दरम्यान ठप्प पडलेल्या शहरातील 13 सिमेंट रस्ताच्या कामाबाबत मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी एसआरके अंकुश जेव्ही कंपनीला नोटीस बजावली आहे. 2024 मध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्य स्तर) योजने अंतर्गत उमरखेड शहर विकास योजना रस्ते विकास प्रकल्पाचे कामाकरीता कार्यादेश निर्गमित करण्यात आलेला होता.
शहरातील पुसद रोड ते करोडी रोड (4 कोटी 16 लाख 27 हजार), जिनिंग ते बेलखेड रोड (4 कोटी 61 लाख 90 हजार), रजा चौक ते उमर चौक (3 कोटी 80 हजार 24 हजार), पुसद रोड ते बेलखेड पांदण (3 कोटी 4 लाख), रुही एम्पोरियम ते मुनीर पटेल (3 कोटी 3 लाख 98 हजार), सुखकर्ता हॉस्पीटल ते साई मंदीर (2 कोटी 42 लाख 57 हजार ), गार्डन ते स्पोर्ट कॉम्पलेक्स (1 कोटी 98 लाख 42 हजार). देव कॉम्पलेक्स ते गार्डन (2 कोटी 4 लाख), जगदंबा साडी ते माहेश्वरी कॉम्पलेक्स (1 कोटी 79 लाख), रामदेवबाबा स्कुल ते नाला (1 कोटी 56 लाख 61 हजार), अराध्या प्रोव्हीजन ते गणपती मंदीर अंबीका प्रोव्हीजन (1 कोटी 29 लाख 38 हजार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माहेश्वरी चौक (57 लाख 73 हजार), गिरी ते बसस्थानक वॉल कम्पाऊंड (67 लाख 89 हजार) या 13 सिमेंट रस्त्यांचा समावेश आहे.
Suvarṇa jayanti shahari vikas mahaprakalp yojana यातील अनेक कामे अर्धवट अवस्थेत करुन काम ठप्प करण्यात आली आहे. तर काही कामांना मुदत संपूनही अद्यापपर्यंत सुरुवात केली नसल्याने एसआरके अंकुश जेव्ही कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. या कामाकरीता नप सोबत केलेल्या करारनाम्यानुसार काम पुर्ण करण्याची मुदत 365 दिवस होती. काम पूर्ण करण्याची मुदत संपूनही कामे अपूर्ण असल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.