संत जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती व गुणवंतांचा सत्कार

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Saint Jagannade Maharaj विदर्भ तेली समाज महासंघ, शाखा एकात्मता नगर यांच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती श्री राधाकृष्ण मंदिर, एकात्मता नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
Saint Jagannade Maharaj
 
कार्यक्रमाची सुरुवात संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष संजय शेंडे होते. Saint Jagannade Maharaj प्रमुख वक्ते डॉ. नामदेव हटवार यांनी समाज एकजुटीची गरज अधोरेखित करत संत जगनाडे महाराजांचे विचार घराघरात पोहोचवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात संजय शेंडे यांनी समाजपरिवर्तनात संतांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. यावेळी मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही पार पडला. समाजबांधव, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: नामदेव हटवार, संपर्क मित्र