महिलेचा चुकीच्या स्पर्शाचा आरोप; VIDEO व्हायरल होताच व्यक्तीने संपवलं आयुष्य

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
कोझिकोड,  
kozhikode-man-suicide केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोझिकोड येथील 42 वर्षीय दीपक यू याने सोशल मीडियावर एक चुकीचा आरोप व्हायरल झाल्यानंतर मानसिक तणावाखाली राहून गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
kozhikode-man-suicide
 
या प्रकरणाची माहिती 'पीटीआय'ने दिली आहे. कोझिकोडच्या गोविंदपूरम येथील रहिवासी दीपक यू याने रविवारी सकाळी स्वतःचा जीव संपवल्याचे समोर आले. kozhikode-man-suicide सकाळी सुमारे सात वाजता त्यांच्या पालकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडल्यावर ते मृतावस्थेत आढळले. काही दिवसांपूर्वी एका महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये दीपकने पय्यानूर रेल्वे स्थानक ते बस स्टँड दरम्यान प्रवास करताना तिला चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला होता. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला आणि सुमारे 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला.
सौजन्य : सोशल मीडिया 
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दीपकला मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ट्रोलिंग, शिवीगाळी आणि मानसिक छळ सहन करावा लागला. सततच्या या दबावाखाली दीपक नैराश्यात गेला आणि अखेर त्यानी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दीपकच्या पालकांनी मुलावर लावलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. kozhikode-man-suicide त्यांनी म्हटले की संबंधित महिलेने फक्त ऑनलाइन प्रसिद्धीसाठी खोटे आरोप केले आणि त्यांच्या मुलाचे चारित्र्यहनन केले. या प्रकरणी कोझिकोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत तपास सुरु केला आहे. अद्याप संबंधित महिलेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र दीपकच्या आत्महत्येनंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. नेटकऱ्यांनी पोलिस तपासाद्वारे सत्य समोर येईल अशी आशा व्यक्त केली आहे.