विविध क्षेत्रातील ज्ञान शक्य तेवढे घ्या

-यशवंत कानेटकर यांचा हितोपदेेश -विदर्भ संशोधन मंडळाचा ‘बी द चेंज’

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
नागपूर,
yashwant kanetkars वेगवेगळ्या क्षेत्रातील जितके ज्ञान घेता येईल तितके घ्या. येणाऱ्या संधी नाकारू नका, त्यातूनच काही चांगल्या आणखी मोठ्या संधी मिळू शकतात, असा हितोपदेश भारतातील संगणक शास्त्रज्ञ, लेखक, वक्ते यशवंत कानेटकर यांनी आज विद्यार्थी व संशोधकांना केला.
 
 

यशवंत कानेटकर  
 
 
विदर्भ संशोधन मंडळाला 92 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंडळाच्या मिराशी सभागृहात आयोजित ‘बी द चेंज’ या कार्यक्रमात यशवंत कानेटकर यांनी विद्यार्थी, संशोधक व उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रातील जितके ज्ञान घेता येईल तितके घ्यावे व येणाèया संधी नाकारू नये. त्यातूनच काही चांगल्या आणखी मोठ्या संधी मिळू शकतात.
एखाद्या विषयाची ‘मला माहिती नाही’ हे न लाजता, हिमतीने म्हणून मार्गदर्शन मागा. इतरांचे ज्ञान, अनुभव याचा आदर करून समस्यांवर उपाय शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय करावा. नोकरी करताना पगार हातात आला तरी तुम्हाला बदल घडवता येणार नाही.
स्वतःच्या व्यवसायात अशा अनेक संधी तुम्हाला मिळतील. ‘व्यवसाय जमला नाही तर नोकरी करू’ ही मागच्या पिढीची मानसिकता आता नवीन पिढीने सोडून द्यावी. कारण, आता खूप सोयी व संधी उपलब्ध आहेत. तरुण पिढीने एक तरी छंद गंभीरतेने जोपासून त्यात झोकून द्यावे व जे शिक्षण घेतले आहे त्यात सतत नवीन जान मिळवत रहावे.yashwant kanetkars कोणताही सांघिक खेळ खेळल्याने इतरांनाही सामावून घेणे व अपयश पचवता येणे साध्य होते. काही झाले तरी आपल्या देशाला विसरू नका. परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलात तरी स्वदेशी परत या, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रारंभी यशवंत कानेटकर यांचे स्वागत विदर्भ संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. मदन कुलकर्णी, प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष पराग पांढरीपांडे, वक्यांचा परिचय रमाई पांढरीपांडे यांनी करून दिला. सौमित्र कोठारी व प्रा. अमरेश शिरवळकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सूत्रे संध्या दंडे यांनी सांभाळली.