भीषण अपघात : नववर्षाची पार्टी जीवावर बेतली

एक ठार, 7 जखमी

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर/नरखेड
nagpur narkhed accident नववर्षाची पार्टी रिसाॅर्टवर साजरी करुन परत येणाऱ्या युवकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर 7 युवक गंभीर जखमी झाले. जखमींवर नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु असून दाेघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. हा अपघात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील सावनेर पाेलिस ठाणे हद्दीतील बाेरगाव शिवारात, एचपी पेट्राेल पंपाजवळ झाला. निखिल रवींद्र गुडधे (32), रा. जबलपूर, असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विक्की गुडधे (30), शुभम गुडधे (30), कुणाल घाेडमारे (32), मनाेज गुडधे (40), शुभम अवस्थी (32), शिवम मनाेदिया व चैतन्य भुजाडे अशी जखमींची नावे आहेत.
 

nagpur narkhed accident 
पाेलिसांनी nagpur narkhed accident  दिलेल्या माहितीनुसार, निखिल गुडधे आणि त्याच्या मित्रांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी धापेवाडा परिसरातील एका रिसाॅर्टवर पार्टीचे आयाेजन केले हाेते.पार्टीसाठी 15 ते 20 जण रिसाॅर्टवर पाेहचले. त्यांनी पार्टी आटाेपल्यानंतर रात्री उशिरा सुमारे 1 वाजताच्या सुमारास सर्वजण राष्ट्रीय महामार्गाने बाेरगाव शिवारातील एचपी पेट्राेल पंपाजवळून जात हाेते. यादरम्यान, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकावर आदळली आणि पलटली. कार जाेरात आदळताच निखिल हा काच ाेडून बाहेर ेकला गेला. मात्र, कार पलटून निखिलवरच आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारमधील इतर सात जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी सहा जण बेशुद्ध अवस्थेत हाेते, तर एक जण शुद्धीत हाेता. त्याने माेबाईलवरून पाेलिस नियंत्रण कक्षाला ाेन करुन अपघाताची माहिती दिली. यानंतर पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाेलिसांनी जखमींना जवळच्या श्रद्धा रुग्णालयात हलवले. तेथे निखिलचा आधीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घाेषित केले. इतर सात जणांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील ट्राॅमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले. त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे.
 
 
बाेरगाव शिवारात कारला अपघात झाला असून एकाचा मृत्यू झाला. सात जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. या घटनेची पाेलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून पाेलिसांनी ताबडताेब मदतीसाठी धाव घेतली. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
- अनिल म्हस्के (अप्पर पाेलिस अधीक्षक)