तभा वृत्तसेवा
पुसद,
akhilesh-agarwal : आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026’ पुसद येथील ज्येष्ठ पत्रकार अखिलेश अग्रवाल यांना जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हिंदी मराठी पत्रकार संघ आणि ‘दर्पण’मार्फत दरवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षण, साहित्य, आरोग्य, कला, राजकारण आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाèया व्यक्तींचा सन्मान केला जातो. पुसद येथील अखिलेश अग्रवाल हे 34 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.
त्यांच्या या कार्यामुळेच त्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. हा गौरव सोहळा मंगळवार, 6 जानेवारी रोजी मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालय हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते अखिलेश अग्रवाल यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे.