पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूची टीका; प्रशिक्षक असताना अपमान

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |

नवी दिल्ली,  

former-australian-player-criticizes-pakistan पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आपल्या विचित्र आणि वादग्रस्त निर्णयांमुळे सातत्याने चर्चेत असतो. या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पीसीबीची अनेकदा नामुष्की होताना दिसते. असाच एक नवा खुलासा ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि आता प्रशिक्षक म्हणून ओळख असलेला जेसन गिलेस्पीने केला आहे.
 
 
former-australian-player-criticizes-pakistan

निवृत्तीनंतर कोचिंग क्षेत्रात प्रवेश केलेल्या जेसन गिलेस्पीने पाकिस्तानच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, केवळ आठ महिन्यांच्या आतच त्यानी या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याच्या वेळी त्यानी कारणे स्पष्टपणे सांगितली नव्हती. मात्र आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर चाहत्यांशी संवाद साधताना त्यांनी यामागची खरी कारणे उघड केली आहेत. गिलेस्पीने सांगितले की, पीसीबीने सहाय्यक प्रशिक्षक टिम नीलसनला  त्याच्या पदावरून हटवताना माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही. former-australian-player-criticizes-pakistan मुख्य प्रशिक्षक म्हणून हा निर्णय माझ्या माहितीशिवाय घेण्यात येणे मला अजिबात मान्य नव्हते. याशिवायही अनेक प्रसंग असे घडले, जिथे मला अपमानित केल्यासारखे वाटले. त्यामुळेच मी कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असे गिलेस्पीने स्पष्ट केले.

जेसन गिलेस्पीच्या कार्यकाळात पाकिस्तान संघाला काही चढ-उतारांचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला २-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला होता. गिलेस्पी आणि पीसीबी यांच्यातील संबंध त्यांच्या कार्यकाळात फारसे सौहार्दपूर्ण राहिले नाहीत. संघनिवडीत अधिकार न मिळणे, कोचिंग स्टाफबाबत घेतलेले एकतर्फी निर्णय यामुळे गिलेस्पी अस्वस्थ होते. अखेर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. former-australian-player-criticizes-pakistan गिलेस्पीच्या राजीनाम्यानंतर पीसीबीने माजी खेळाडू अझहर महमूदची कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच पीसीबीने त्यांनाही पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डमधील अस्थिरता पुन्हा एकदा समोर आली आहे.