आर्वी,
employees-committed-fraud : स्थानिक भारत फायनान्स कंपनीत संघम मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या पाच कर्मचार्यांनी कर्जदारांकडून वसुल केलेली रकम बँकेत जमा न करताना तब्बल २० लाख ७६ हजार ८०१ रुपयांचा गंडा घातला. ही घटना गुरुवार १ जानेवारी रोजी उघडकीस आली.
येथील भारत फायनान्स कंपनीत सागर देशमुख (२९) रा. शिरखेड जि. अमरावती, दर्शना खाजोने (२१) रा. आष्टी, मनोज निंबुळकर (२९) रा. मोहदी जि. नागपूर, अजय उईके रा. दळवी, जि. नागपूर, अमीर खान हमीद खान (२४) रा. शेंदुरना जि. अमरावती हे येथे कार्यरत आहेत. हे पाचही जण कर्ज घेतलेल्या ग्राहकांकडून कर्जाची वसुली करतात. या पाचही कर्मचार्यांनी ग्राहकांकडून नियमित कर्जाची वसुली केली. परंतु, ग्राहकांना कर्जाच्या पावती दिल्या नसून बँकेत पैसेसुद्धा जमा केले नाही. दरम्यान, शाखा व्यवस्थापक इरफान खान बशीर खान (३५) यांनी कर्मचार्यांसोबत वसुलीदारांच्या मिटिंगला भेट दिली. त्यावेळी कर्जदारांकडून वसुली केलेले तब्बल २० लाख ७६ हजार रुपये बँकेज जमा न केल्याचे उघडकीस आले. तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.