मुंबई,
heavy rainfall नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला राज्यात जोरदार पाऊस सुरू असतानाच दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचे ढग गायब झाले होते. मात्र, ऐन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२६ रोजी राज्याच्या काही भागात अचानक मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे नागरिकांची फजिती झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका होता, पण अचानक झालेल्या पावसामुळे लोकांना या हवामान बदलाचा चटका बसला.
भारतीय हवामान heavy rainfall विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यातही राज्यातील थंडी कायम राहणार आहे. तसेच काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही राज्यातील काही भागात दिवसभर ढगाळ वातावरण राहील, तर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या heavy rainfall अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा पूर्वानुमान आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये थंडीची लाट कायम राहणार आणि गारपीट होणार . जानेवारी महिन्यात राज्यातील काही भागात कमी-अधिक पाऊस होईल, परंतु राज्यातून पूर्णपणे पाऊस थांबणार नाही.उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. विशेषत: मेरठ, गाझियाबाद, नोएडा, हापूर, बागपत, बुलंदशहर, सहारनपूर, शामली, मोरादाबाद आणि बिजनौर येथे पावसाचा इशारा जारी केला गेला आहे. तसेच २ ते ५ जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये पावसाची तसेच गारपीठ पडण्याची शक्यता आहे.दक्षिण भारतातही हवामान बदल दिसून येत आहे. तामिळनाडूत २ आणि ३ जानेवारीला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे . मुंबई, दिल्ली आणि पुणे या शहरांमध्ये तर प्रचंड वायू प्रदूषण वाढले असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे महापालिकांना कोर्टाने सुद्धा फटकारा दिला आहे आणि वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे.हवामान विभाग नागरिकांना सुचना करत आहे की, पावसाळ्यासाठी योग्य तयारी ठेवावी आणि थंडीत आरोग्याची काळजी घ्यावी.