रस्त्यात 'अश्लील चाळे विनयभंग' ... मग पोलिसांचा अ‍ॅक्शन मोड तयार

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
sexual harassment case शहर पाेलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा दावा केला हाेता. ताे दावा सत्यात उतरला असून एका तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या आराेपीविरुद्ध कपीलनगर पाेलिसांनी आठ तासांत गुन्हे दाखल करुन आराेपपत्र न्यायालयात पाठवले. यापूर्वी ही किमया काेतवाली पाेलिसांनी केली हाेती, हे विशेष.
 
 

sexual harassment case  
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,sexual harassment case भंते आनंद काैशल्यानगर येथे राहणाऱ्या दाेघी बहिणी बुधवारी सकाळी सात वाजता एका धार्मिक कार्यक्रमाला जात हाेत्या. घराच्या काही अंतरावर असताना आराेपी विनाेद पृथ्वीराज रंगारी (वय 45) हा त्यांच्याजवळ आला. विनाकारण त्यांच्याशी बाेलायला लागला. एका तरुणीला ‘तू खूप सुंदर दिसतेस. मला तू आवडतेस. माझ्यासाेबत फिरायला चलतेस का? असा बाेलायला लागला. त्यामुळे एका तरुणीने त्याला नकार दिला आणि तेथून जाण्यास सांगितले. त्यामुळे विनाेदने त्या तरुणीशी अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केला. विनाेदच्या अचानक वागण्यामुळे दाेन्ही तरुणी घाबरल्या आणि घराकडे पळाल्या. त्यांनी घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलींच्या आईने विनाेद याला जाब विचारला. त्याने मुलींच्या आईशीसुद्धा आरेरावी केली.‘तुला जे कारायचे ते करुन घे. मी पाेलिसांनासुद्धा घाबरत नाही.’ असे म्हणून निघून धमकी देऊन निघून गेला.
 
 
पाेलिसांत तक्रार अन् लगेच अ‍ॅक्शन
पीडित महिला sexual harassment case  कपीलनगर पाेलिस ठाण्यात पाेहचली. त्यांनी ठाणेदार सतीश आडे यांना घडलेला प्रकार सांगितला. पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन तासाभरातच आराेपी विनाेदचा शाेध घेऊन अटक केली. चार पाेलिस अधिकाèयांना तपास करण्यास सांगून अवघ्या आठ तासांत आराेपपत्र तयार करुन न्यायालयात दाखल केले. न्यायालयानेही गांभीर्य दाखवून कारवाई सुरु केली. यापूर्वी काेतवालीचे ठाणेदार रितेश अहेर यांनीसुद्धा विक्रमी आठ तासांत गुन्हा दाखल करुन आराेपपत्र न्यायालयात दाखल केले हाेते.