प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Neri Mirzapur, आर्वी तालुका नव्हे तर विधानसभा क्षेत्रच प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. महानगरांमध्ये जे घडते ते आर्वी तालुयात घडले आहे. एक खासदार आणि दोन आमदारांचे आर्वी झाले. विकासातही याच तालुयाने पुढाकार घेतला आहे. सत्ताधारी पक्षातील अंतर्गत वादही बेधडक रस्त्यावर आले आहेत. त्याच तालुयातील नेरी मिर्झापूर या गावात घरोघरी संविधान वाटण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवल्या जात आहे. नेरी मिर्झापूरच्या सरपंचांनी आपल्या गावाच्या विकासाचा विडाच उचलला आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून नावीन्यपुर्ण उपक्रमा अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाकडे संविधान ग्रंथ भेट कार्यक्रम राबवल्या जात असतानाच संविधानाची ओळखही करून दिली जात आहे. मिर्झापूर नेरी या छोट्या गावाची कीर्ती सध्या महाराष्ट्र रोज ऐकतो आहे. आ. सुमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनात या गावाने विकासाची वाट पकडली आहे.राज्य शासनाच्या योजनांची शंभर टके अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सरपंचांचा असतो. वर्धा जिल्ह्यातील पहिले सौरग्राम म्हणून या नेरी मिर्झापूरची नोंद झाली आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात पुण्यातील यशवंतराव चव्हाण (यशदा) प्रबोधिनी येथील विविध विभागातील अधिकारी, परिविक्षाधीन अधिकार्यांनी याच गावाचा दौरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यअधिकारी म्हणून काम केलेले आणि प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव असलेले आ. सुमित वानखेडे यांनी यशदातील अधिकार्यांना मार्गदर्शन केले होते. गावात प्रत्येक घरावर सौर उर्जा पॅनल लावून गाव सौरग्राम केले. त्याचप्रमाणे प्रत्येक घरात ‘संविधान’ हे अभियान नेरी मिर्झापूर या गावात राबवण्यात येत आहे.
संविधान वाटपाचा सामूहिक कार्यक़्रम नेरी येथील पंचायत लर्निंग सेंटरच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोणत्याही गावाचा विकास हा त्या गावातील लोकांच्या वैचारिक आणि मानसिक दृष्ट्या एकत्र येण्याने आणि अंतर्गत मतभेद विसरून आपसात बंधुभाव आणि जिव्हाळा निर्माण केल्याने साधता येतो असे प्रा. डॉ. रविंद्र सोनटक्के म्हणाले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत संविधान पुस्तके भेट देण्याकरिता प्रा. डॉ. उमेश मेश्राम, प्रा. डॉ. प्रवीण काळे, प्रा. डॉ. अनिल दहाट, डॉ. मनीषा खाकरे, प्रा. डॉ. रवींद्र सोनटक्के, प्रा. डॉ. मनोहर कोल्हे यांनी मदत केल्याची माहिती सरपंच बाळा सोनटके यांनी दिली.