केळझर,
siddhi-vinayak-kelzar : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी येथील सिद्धी विनायक गणपती मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला होता. मंदिरात गुरुवार १ रोजी पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हजारो भाविकांनी सिद्धी विनायकाच्या चरणी नतमस्तक होत नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय होवो, अशी प्रार्थना केली. पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह तरुण-तरुणी आणि बालगोपालांनीही उत्साहात दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते. रांगा, स्वच्छता, पिण्याचे पाणी व शिस्तबद्ध दर्शन यासाठी स्वयंसेवक तैनात होते.