हैदराबाद,
young-man-dies-after-eating-biryani नववर्षाचा आनंद क्षणातच दुःखात बदलणारी धक्कादायक घटना हैदराबादमधून समोर आली आहे. न्यू ईयर पार्टीदरम्यान जेवण केल्यानंतर अनेकांची प्रकृती अचानक बिघडली असून, या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बनावट दारू किंवा अन्नातून विषबाधा यापैकी नेमके काय कारण ठरले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून बनावट दारू आणि अन्नातून विषबाधा (फूड पॉइझनिंग) या दोन्ही शक्यतांचा तपास केला जात आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ५३ वर्षीय व्यक्तीने पार्टीदरम्यान दारू सेवन केली होती. तसेच त्याने चिकन बिर्याणी, फिश करी आणि चपात्याही खाल्ल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. young-man-dies-after-eating-biryani नववर्षाच्या पूर्वसंध्येला हैदराबादमधील जगदगिरी गुट्टा परिसरातील भवानी नगर असोसिएशन कमिटी हॉलमध्ये १७ जण एकत्र जमले होते. या सर्वांनी पार्टीत जेवण केल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडू लागली. परिस्थिती गंभीर झाल्याने सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, पार्टी सुरू असताना सर्व काही सुरळीत होते. मात्र उपस्थितांनी जेवण केल्यानंतर लगेचच अनेकांना चक्कर येणे, उलट्या आणि अशक्तपणा जाणवू लागला. young-man-dies-after-eating-biryani जेवणानंतर एकूण नऊ जण बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने की नारायण मल्ला रेड्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय आणखी दोन जणांना रामदेव रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला आहे. पार्टीमध्ये उरलेले अन्न पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. तसेच या घटनेत बाधित झालेल्या व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले असून, नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.