शनिवारी टेकडी गणेशाचा महाअभिषेक सोहळा

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Pushya Pournima 2026 महाराष्ट्राची हिवाळी राजधानी व ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात स्थित टेकडी गणपती हे विदर्भ अष्टविनायकांतील प्रथम स्थानाचे गणपती आहेत. नववर्ष २०२६ च्या पहिल्या शनिवारी, दिनांक ३ जानेवारीला येथे १०८वे गणपती अथर्वशीर्ष सहस्र अभिषेक आयोजित करण्यात आला आहे. पुष्य पौर्णिमा, शाकंभरी जयंती व शनिदेवांच्या जन्मनक्षत्राचे औचित्य साधत सकाळी ९ वाजल्यापासून हा धार्मिक विधी पार पडणार आहे.

tekdi 
 
याच दिवशी रामटेक येथील अष्टादशभुज विनायकाच्या सान्निध्यात १०९वे, तर ४ जानेवारी रोजी आदासा येथील शमी गणपती मंदिरात ११० वे सहस्र अभिषेक संपन्न होणार आहे.Pushya Pournima 2026 या अभिषेकांमध्ये सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन सहस्र अभिषेक समन्वयक विनोदकुमार महावादी यांनी केले आहे.
सौजन्य:प्रदीप खर्डेनवीस, संपर्क मित्र