वीर जवानाच्या सन्मानार्थ आ. वानखेडेंचा मोठा निर्णय

आर्वी नपचा पदग्रहण सोहळा स्थगित

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |
आर्वी,
Sumit Wankhede तालुयातील चिंचोली (डांगे) येथील सुपुत्र आणि आयटीबीपीचे वीर जवान सुरेंद्र कुंभरे यांच्या निधनामुळे आर्वी आर्वी परिसरात शोककळा पसरली आहे. देशाच्या सीमेचे १६ वर्षे अहोरात्र संरक्षण करणार्‍या या वीर पुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आ. सुमित वानखेडे यांनी संवेदनशील निर्णय घेतला आहे. आज होणारा पुर्व नियोजित आर्वी नगरपरिषदेचा नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकांचा पदग्रहण आणि सत्कार समारंभ रद्द करून तो उद्यावर ढकलण्यात आला आहे.
 

Sumit Wankhede takes a major decision in honor of the brave soldier 
आपल्याच मातीतील जवानाचे देशसेवा बजावत असताना निधन झाले असताना उत्सव करणे योग्य नसल्याची भावना ठेवून त्यांनी नियोजित कार्यक्रम स्थगित करण्याच्या सूचना दिल्या. भारत-तिबेट सीमा सुरक्षा दल मध्ये शुन्य डिग्री खालच्या अतिशय कठीण तापमानात कार्यरत जवानाच्या बलिदानाप्रती संवेदनाच व्यत करण्यात आल्या.
सुरेंद्र कुंभरे यांनी २००९ पासून भारत-तिबेट सीमा सुरक्षा दलात आपली सेवा बजावली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच आ. सुमित वानखेडे यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आज चिंचोली येथे वीर जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. जवानाच्या सन्मानासाठी सत्तेचा सोहळा लांबणीवर टाकण्याच्या या निर्णयाचे शहरात कौतुक होत आहे.नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार वीर जवानाला मानवंदना देण्यासाठी आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. उद्या ३ रोजी नगरा