माजी जि. प. अध्यक्ष सुनील वर्‍हाडे भाजपात

-समर्थकांनी पण घेतला प्रवेश -पालकमंत्र्यांनी केले स्वागत

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |
अमरावती, 
sunil-varhade : जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सहकार नेते सुनील वर्‍हाडे यांनी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांच्या पुढाकाराने आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वलगाव येथील सीकची रिसॉर्टमध्ये आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश झाला.
 
 
JK
 
यावेळी राज्यसभा सदस्य अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, माजी मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी संजय कुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. या प्रवेशामुळे भाजपला जिल्ह्यात मोठी बळकटी मिळणार असून, सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्वाचा पक्षाला फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. सुनील वर्‍हाडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करताना विकासाभिमुख दृष्टिकोन व्यक्त केला. ते म्हणाले, भाजपचे धोरण हे केवळ जनसामान्यांच्या कल्याणासाठी आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मी पक्षात सामील होत असून, महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकार्यांना गती देण्यासाठी प्रयत्न करेन. मंत्री बावनकुळे यांनी आमदार राजेश वानखडे यांच्या कार्याची प्रशंसा केली. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या कामगिरीच्या पडताळणीत राजेश वानखडे पहिल्या २५ आमदारांमध्ये आहेत. या मेळाव्यात वलगाव जिल्हा परिषद सर्कलमधील ३ कोटी ६९ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजनही झाले.
 
 
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन गुडधे, उपाध्यक्ष विवेक गुल्हाने, तालुकाध्यक्ष वीरेंद्र लंगडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मनोज देशमुख, तिवसा विधानसभा संयोजक प्रदीप गौरखेडे, आरती वानखडे, छाया दंडाळे, मामा निर्मळ, सुमीत पवार, ज्योती यावलीकर, विजय भुयार, सागर काळे यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते.