अध्यक्षांनी सादर केला 100 दिवसांचा कृती ‘आराखडा’

अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी स्वीकारला पदभार

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
priyadarshini-uike : यवतमाळ नगर परिषदेमार्फत विविध विकासाच्या कामांसह महिला सुरक्षेवर भर दिला जाणार आहे. तसा शंभर दिवसांचा प्रस्तावित कृती आराखडा नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी शुक्रवार, 2 जानेवारी रोजी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत सादर केला.
 
 

y2Jan-Priyadarshani 
 
 
 
या पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल चौहान, नगर परिषदेतील भाजपा गटनेते नितीन गिरी उपस्थित होते. पुढे बोलताना नप अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी, नगर परिषद यवतमाळचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात येणार आहे. ‘एआय चाट बोट’ सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. क्यूआरकोडस्कॅन करुन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व विभागाचे अद्ययावत स्वयंप्रकटीकरण करण्यात येणार आहे, असे सांगितले.
 
 
त्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात येणार आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे. विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यत पोहचविण्यात येणार आहे. दृष्टीहिन नागरिकांसाठी स्क्रीन रिडरचा पयार्य उपलब्ध करुन देणे. त्याचबरोबर महिला सुरक्षेवर भर देण्यात येणार आहे. युवक-युवतींना नगर परिषदेंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम व स्वयंरोजगारक्षम बनविण्यात येणार आहे. नागरिकांना विविध व्यवसायांकरिता स्टार्ट अप व इनोव्हेशनकरिता प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
महिला, युवक व युवतींकरिता विविध महामंडळाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करणाèया विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कार्यालयातील अभिलेख निंदनिकरण व वर्गीकरण करण्यात येणार आहे. मुदतबाह्य अभिलेख नष्ट करण्यात येणार आहे. जुन्या व निरुपयोगी जड वस्तूंची विल्हेवाट करण्यात येणार आहे. जड वस्तू संग्रह नोंदवही अद्ययावत करण्यात येणार आहे.
 
 
शहरात सुलभ दळण-वळणाकरिता रस्त्यावरील बेवारस वाहने हटवण्यासाठी कारवाई, कार्यालयातील जुन्या वाहनाचे निर्लेखन, शहरात रस्ते स्वच्छता मोहीम राबविणे अशी विविध कामे 100 दिवसांच्या कृती आराखड्यात करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके सांगितले.